We bring you more reflections and more learnings with this fourth instalment of YUVA Meri Nazar Mein.
YUVA has always been a ‘cutting edge’ organisation and has worked towards tackling many social and economic issues for the welfare of the downtrodden. YUVA facilitated the establishment of different entities which today, stand independently on their own.
For me, YUVA has been the starting point in my career (after completing post-graduation in Urban and Regional Planning) and it has helped shape my perspective towards life. It helped me realise the significance of field work, taught me the strategies behind increasing community participation and in a way building my managerial skills which I am sure, will be helpful throughout my career.
When I was associated with YUVA’s work, major interventions were made in slum redevelopment, rehabilitation and resettlement, transfer of development rights (TDR) and development rights along with rural and agricultural development, women’s empowerment through federations etc.
I wish YUVA a healthy and stable growth, as an organisation, and I hope that it sets a mark of high standards for other non-profits in India. I wish YUVA very good luck!
Shilpa Mirashi, Former Staff, YUVA
मी 2006 पासून ‘युवा’ या सामाजिक संस्थेत नवी मुंबई शहरात कार्यरत आहे. शहरी गरिबांच्या प्रश्नांवर काम करण्याची संधी मला ‘युवाने’ दिली. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मला कामाचा कोणताही अनुभव नव्हता, पण युवाने हे काम करायला शिकविले. युवाने मला प्रथम जात — धर्म विसरायला सांगुन माझ्यातला माणूस शोधण्याची संधी मला दिली. कामला सुरुवात केली ती संघर्षातुन, मग तो संघर्ष घरचा असो की बाहेरचा,पण तो कसा, केव्हा आणि कश्या पद्धतीने करायचा ते मला युवा संस्थेने शिकवले.
आज युवाला 35 वर्षे पूर्ण होत आहेत, याचा एक वेगळाच आनंद आहे. दिवसेंदिवस युवाचे काम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचेल अशी अपेक्षा आहे. शेवटच्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळेपर्यंत युवा काम करत राहिल.
Shanta Khot, Staff, YUVA
युवा संस्था के माध्यम से मैने अलग अलग बस्ती के बच्चों के साथ जुड़ के काम किया. बच्चों के सर्वांगीण विकास के बारे में उन्हें अलग अलग स्किल के माध्यम से उन के भविष्य के लिए तैयार करना ये महत्वपूर्ण काम था. बच्चों पे होनेवाले अत्याचार के केसेस बस्ती के लोगो को साथ लेकर हल किये जाते थे. कई बार लोगो को पोलिस कारवाई के बारे में जानकारी नही होती, या फिर उन्हें डर लगता है. पोलिस भी कई बार बस्ती के लोगो से सही तरीके से बात नही करते, तो इस बीच के किरदार को निभाने का मुश्किल काम जो युवा के साथियों के साथ मिलकर मुझे करने का मौका मिला और उसे मैने बखुबी निभाया. बच्चों के सवालो को लेकर काम करते वक़्त एक बड़ी मुश्किल होती है वो ये के बच्चों को उन पे हुए अत्याचार के बारे में पता ही नही होता के ये अत्याचार है और अगर अत्याचार करने वाला घर का ही सदस्य या कोई जानपेहचान का हो तो ये मुश्किल और भी बढ़ जाती है. लेकिन संघटन के साथ ऐसे कई साथी होते है जो चाइल्ड काउंसिलिंग के माध्यम से इस मुश्किल को आसान कर देते है. बच्चों के संघटन बनाना, बच्चों के साथ बाल अधिकार मुद्दों पर काम करना, बस्तीस्तर पर बाल संरक्षण समिती का गठन करना, पुलिस, स्कुल, आंगणवाडी इन तमाम मुद्दों पर मुझे काम करने का मौका मिला, कुछ हदतक कामयाबी मिली. इन सारे काम मे मुझे युवा से लगातार मिली ट्रेनिंग बहोत काम आयी, युवा के माध्यम से मुझे लैंगिकता (सेक्सयूलिटी) विषय पर ट्रेनिंग के लिए दिल्ली भेजा गया. जिसका बस्ती के बच्चों के सवालों पर काम करने में बहोत आसानी हुई. औरतों के शरीर के अंगों को ले कर जो गालियां देते है उस संदर्भ में मेरी सोच एकदम से बदल गयी, जिसका मैन अपने घर से अमल शुरू की, अपने बेटों के साथ और भाइयों के साथ मैन इस विषय मे बात की और उस मे अब बहोत सुधार दिखता है. और तो और मेरे पड़ोस के कुछ बच्चे जो हमेशा गालीगलौच करते थे उन के साथ भी मैन बात की. उसी के साथ JJ Act के बारे में और बाल अधिकार के बारे में भी युवा में मुझे ट्रेनिंग मिली.
मुझे ये सारी बाते पहले पता नही थी. युवा ने मुझे महिला अधिकार के तहत हाजी अली में औरतों को प्रवेश मिलने के लिए छिड़े “हाजी अली सब के लिए” आंदोलन में हिस्सा लेने का मौका दिया, जिस का मुझे मेरे निजी जीवन मे भी बहोत उपयोग हुवा.
जब मैं बस्ती में या किसी ट्रेनिंग में सेक्सयूलिटी पे बात करती हूं तो लोक अचंभित हो जाते है के एक मुस्लिम औरत इस विषय पे बात कर रही है. साथ ही साथ युवा संस्था मे हों रहे स्टडी सर्कल मे, स्टाफ मिटींग मे अपनी राय रखना, सवाल को उठाना, अपनी बात बेहीजक रखने का आत्मविश्वास मुझे युवा संस्था मे ही मिला है.
मेरे इस काम से समाज मे क्या परीवर्तन आया या नही, ये मै नही जानती लेकिन मेरे निजी जिंदगी में और मेरे परिवार में यकीनन परीवर्तन आया है. जिस से मुझे इस विषय मे काम करने में और ऊर्जा मिलती है.
मैं युवा को धन्यवाद देना चाहती हु.
Shabana Ansari, Former Staff, YUVA
On the occasion of its 35th founding year, I would like to congratulate YUVA and all of its members and partners. I was associated with YUVA from 2010, working towards the issues of street vendors & urban poor in Jharkhand and also towards gender equality. As we are aware, street vendors are the second largest force in the unorganised sector of our work force but they are also one of the most vulnerable group in society, particularly the women street vendors. In 2011, the first Street Vendors Act was passed in Jharkhand. It is due to the sustained collective actions of the street vendors which was complemented with strong advocacy and policy recommendations. Without active help from YUVA it wouldn’t have been possible. The street vendors of Jharkhand played a major role in getting ‘The Street Vendors (Protection of Livelihood and Regulation of Street Vending) Act, 2014’ passed.
The All India Women’s Hawker Federation was formed in 2017 and YUVA played a significant role in the process of formation. The Federation not only champions the issues of street vendors but also raises the issues of gender equality, sexual harassment at work place and women’s work place conditions and facilities such as crèches and toilets.
On behalf of All India Women Hawkers Federation, I express solidarity with YUVA. We would like to build a strong bond with YUVA to drive social change in future.
Anita Das, Consultant, YUVA
माझ्या नजरेतून युवा
मी मनिषा यशवंत पारळे, 2011 साली युवाच्या चाईल्ड लाईन या प्रकल्पात रुजू झाले होते. त्यापूर्वीही मी वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. युवा या नावातच ऊर्जा आहे, काम करण्याची उमेद आहे. युवा संस्थेमध्ये जेव्हा मी रुजू झाले तेव्हा मला युवामध्ये महिलांच्या बाबतीत असलेली समानता प्रकर्षाने जाणवली. इथे सगळे एकमेकांना साथी म्हणून संबोधतात. यावरूनच युवा संस्थेमध्ये एकमेकांना किती आदराने पाहिले जाते हे लक्षात येते. युवाच्या चाईल्ड लाईनच्या कामात खूप आव्हानात्मक केसेसला सामोरे जावे लागले, अनेक बाल लैंगिक शोषणाच्या, बाल विवाहाच्या, कौटुंबिक बाल मजुरीची प्रकरणे हाताळताना अतिशय रिस्क परिस्थितीत आम्ही काम करताना अशावेळी संस्थेचे केंद्र समन्वयक साथी विजय खरात व इतर साथी आम्हा महिला कार्यकर्त्यांची काळजी घेत असत व विचारपूस करत. युवामध्ये येण्या आगोदर मला मानवी अधिकार याबाबत फारशी माहिती नव्हती, विशेषतः मुलांना ही अधिकार असतात आणि त्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी मोठ्यांची आहे हे मला युवामध्ये आल्यावरच समजले. युवामध्ये मी कधीही वरिष्ठ आणि कनिष्ठ हा भेदभाव पाहिला नाही आणि मला ही कधी जाणवला नाही. आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत युवाचे वरिष्ठ कार्यकर्ते अगदी मनापासून बोलायचे, कधी कधी एकत्र बसून जेवायचे सुद्धा. युवामधील चळवळीची गाणी ही मला भारावून टाकत असे. समानतेची आणि समाजात होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात असलेली ही गाणी मला कायम प्रेरणा देतं राहिली आहेत. युवा संस्थेमुळे मला अगदी कठीण प्रसंगाला कसे सामोरे जायचे हे शिकायला मिळाले. युवा संस्थेमध्ये असतानाच मी माझे एमएसडब्लू (MSW) चे शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण पुर्ण करण्यासाठी मला युवाचे कार्यक्रम संचालक साथी राजू भिसे दादा, कार्यक्रम समन्वयक साथी मेरी आणि आमच्या चाईल्ड लाईन प्रकल्पाचे केंद्र समन्वयक साथी विजय यांनी कायम प्रोत्साहन दिले आणि सहकार्य केले. युवा संस्थेच्या माध्यमातून मला बाल संरक्षण, त्याच्याशी संबंधित यंत्रणा पोलीस, जापू, बाल कल्याण समिती, सेशन कोर्ट यांच्यासोबत अतिशय जवळून काम करण्याची संधी मिळाली, जेजे कायदा आणि पॉक्सो कायदा समजून घेता आला. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, नेटवर्क वाढले. युवा संस्थेत राहून मला अनेक उपक्रम करण्याची तीव्र ईच्छा होती मात्र काही कारणांमुळे ती राहून गेली याची खंत मात्र मनात कायम राहील. युवा संस्थेने 35 वर्ष पुर्ण केले आहेत, त्याबद्दल मी सर्व युवा साथीचे मनापासून अभिनंदन करते. या 35 वर्षात मी युवा मध्ये 5 वर्ष स्वतःचे योगदान देवू शकले ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आज मी एक यशस्वी कौटुंबिक समुपदेशक म्हणून कार्यरत आहे यामागे काही प्रमाणात युवाचे ही योगदान आहे. युवा कार्यकर्ते घडवते आणि यापुढे ही युवा ने कार्यकर्ते घडवावेत हीच मनापासून शुभेच्छा व्यक्त करते.
धन्यवाद.
Manisha Parle, Former Staff, YUVA
मी ‘युवा’ संस्थेच्या संपर्कात 1984–85 च्या दरम्यान आलो. त्यावेळी मी ‘धारावी नागरिक कृती समिती’ या सामाजिक संघटनेच्या सामाजिक कार्यात सहभागी होत असल्याने युवाची व माझी भेट झाली. त्यानंतर ‘युवा’ संस्थेच्या 1987 साली घेण्यात आलेल्या ‘शहरी चेतक प्रशिक्षण’ कार्यक्रमात सहभागी होऊन मी हे प्रशिक्षण ६ महीने पूर्ण वेळ देऊन पूर्ण केले. धारावीतील अनेक प्रश्नांवर ‘युवा’ च्या माध्यमातून काम केले. मी युवामध्ये 1988 ते 1990 च्या दरम्यान पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून ‘घर हक्क समिती’, जोगेश्वरीतील आय. वाय. जे. प्रकल्प व युथ राईट प्रकल्पामध्ये काम केले. युवामुळे जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन मिळाला व सामाजिक भान आले. भारतातील अनेक शहरांत व महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात जाऊन सामाजिक कार्यात सहभाग घेता आला. इथेच मला माझी सहचारिणी सुषमा मिळाली. ‘युवा’ च्या प्रवासात अनेक चांगले — वाईट लोक भेटले. या सर्व लोकांकडून एक वेगळाच अनुभव मिळाला. आज मी पत्रकार म्हणून कार्यरत आहे. याचे बाळकडू युवामध्येच मिळाले होते, त्याचा फायदा आज होत आहे. युवा ने 35 वर्ष पूर्ण केली याबद्दल मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून युवाला खूप खूप शुभेच्छा देतो.
Sanjay Shinde, Member, Dharavi Nagrik Kruti Samiti
YUVA would like to express heartfelt gratitude to all the people who have contributed to YUVA’s journey of 35 years.
For other instalments of the YUVA Meri Nazar Mein Series, see #1, #2, #3, #5