Skip to main content
Learning and DevelopmentNarrative ChangeYUVA

#YUVA35: YUVA Meri Nazar Mein Part 3

By August 30, 2019December 24th, 2023No Comments

Today, YUVA completes 35 years since being founded. On this special occasion, we share with you the third instalment of YUVA Meri Nazar Mein, a collection of stories from those who have been associated with YUVA.

युवा या संस्थेमध्ये मी १९८८ पासून कार्यरत होतो. २७ वर्ष मी युवामध्ये पूर्ण वेळ देऊन काम केले. संस्थेमध्ये काम करत असताना मी प्रथमता जोगेश्वरी पूर्व मध्यवर्ती समिती, स्थानिक संघटन यांच्या माध्यमातून युवाच्या संपर्कात आलो. संजय गांधी नगरचे स्थानिक प्रश्न घेऊन त्यामध्ये पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, रेशनिंगचा प्रश्न घेऊन मी संस्थेबरोबर जोड्लो. मुंबईतील झोपडपट्टीमध्ये काम करण्याची एक संधी मला युवा संस्थेच्या माध्यमातून मिळाली. काम करताना संघटन बांधणी, फुटपाथवरील नागरिक संघटनाबरोबर काम करायला सुरुवात केली. जोगेश्वरी मध्ये 2-३ वेळा दंगली झाल्या, त्यावेळी आम्ही शांततेच्या दृष्टीने काम केले. विशेषत: भाडेकरुंच्या प्रश्नांवर आम्ही खुप काम केले. या प्रक्रियांमधून मला मुंबई स्तरावर काम करण्याची संधी देखिल मिळाली. फुटपाथवरील लोकांबरोबर जेव्हा आम्ही काम केले तेव्हा तिथे आठ दिवसात दोन — तीन वेळा तोड़मोड़ होत असे. त्यावेळी आम्ही लोकांचे पुरावे तयार करण्यावर भर दिला. त्यामध्ये रेशन कार्ड बनविणे, जन्म दाखला बनविणे, मतदान कार्ड बनविणे इत्यादी मुलभुत कागदपत्रे बनवून आम्ही त्याची एक फ़ाइल् तयार करण्याचे काम केले. त्यापैकी ९० % लोकांना आज मानखुर्दमध्ये घरे मिळाली आहेत. आजही ते लोक युवाचे नाव घेतात. युवा संस्था ही शोषित, कष्टकरी, वंचित लोकांना सोबत घेऊन काम करते. लोकांबरोबर आम्ही भाब्रेकर नगर, अंबुजवाडी, खारोड़ी, मंडाला या ठिकाणी काम केले. या सर्व कामाबरोबर आम्ही मुंबईच्या विकास आराखद्यावर काम केले. काम करतेवेळी मला युवाकडून सामाजिक, आर्थिक पाठिंबा नेहमी मिळत राहिला. हा पाठींबा / सहकार्य मिळाल्याने मी जो बेकार झालो होतो त्यातून मी सावरलो. युवामध्ये काम करताना मला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याच्या संधी मिळाल्या. फिलिपिन्स, कम्बोडियाला जाण्याची संधी मिळाली. यातून मला जन आंदोलन का्य असते ते समजले. तसेच भारताच्या विविध भागांची माहिती घेता आली. मुंबईत नेतृत्व उभ करण्याची संधी मला शहर विकास मंचच्या माध्यमातून, हमारा शहर, हमारा विकास च्या माध्यमातून मिळाली.

पुन्हा एकदा मी सांगेल की, युवा ही समाजातल्या शेवटच्या माणसाबरोबर काम करणारी संस्था आहे. म्हणून युवाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोण हा आदरणीय असा आहे. मी गेली २७ वर्ष जे काम केले त्यामध्ये लोकांना प्रशिक्षण देऊन, मोर्चे काढून, धरणे आंदोलन करून सक्षम करण्याचा प्रयत्न केला.

धन्यवाद् !

Mohan Chawan, Former Staff, YUVA

मी पाहिलेली आणि अनुभवलेली युवा….

मला युवामध्ये २ वर्ष पूर्ण झाले. या दोन वर्षाच्या युवाच्या प्रवासात / सान्निध्यात मी अनेक गोष्टी शिकलो. खर तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नांच्या मुळाला हात घालून त्याचे मूळच खोडून काढण्यासाठी युवाचा वेगवेगळ्या पद्धतीतून सुरु असलेला प्रवास मला समाजपरिवर्तनासाठी एक महत्वाचा विचार देतो. महिला, युवक, बालके, असंघटीत क्षेत्रातील कामगार, बेघर, सरकार यांच्याबरोबर सूक्ष्म स्तरापासून समग्र स्तरावर वेगवेगळ्या प्रक्रिया आपण कशा पद्धतीने चालविल्या पाहिजेत याचे निरीक्षण करता आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने २ वर्ष काम करता आले. एकात्मिक समाजकार्याचा एक महत्वपूर्ण दृष्टीकोन मला युवाच्या सगळ्या प्रक्रियांमधून शिकायला मिळाला. हे सर्व तर मी शिकलोच परंतु त्याचबरोबर मला माझा स्वताचा एक पाया निर्माण करता आला, ज्यामुळे मी वेगवेगळ्या विषयावरील ज्ञान ग्रहण केले आणि महत्वपूर्ण / गरजेच्या विषयावर सत्र घेण्याची, प्रशिक्षण देण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण झाली.

शहरामध्ये असणारी जटिलता, विविध क्षेत्रात वाढत असणारी गुंतवणूक, होत असलेला विकास, ताठर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया, विकासापासून कायम आणि वर्षानुवर्ष वंचित राहणारा शोषित वर्ग आणि शहरी गरीब याबाबत माझ्यामध्ये निर्माण झालेली समजदारी केवळ युवामुळे शक्य झाली हे मला नाकारता येणार नाही. नियोजन, संवाद, कृती, कौशल्य, टीकात्मक परीक्षण, पुढाकार, कार्यकर्ता यांसारख्या संकल्पना केवळ लक्षात न घेता त्या प्रत्यक्षात युवामध्ये अनुभवता आल्या. युवामध्ये गटकार्य, वैयक्तिक कार्य यासारख्या संकल्पनांची समुदाय विकासासाठी चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करता आली. एक विशिष्ट विचारसरणी घेऊन शहरात शांतता आणि सद्भावना कशी निर्माण करता येईल? यासाठी युवाचे वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेले प्रयत्न मला मानसिक समाधान देतात.

माझ्यामध्ये असणारे सुप्त गुण मला वारंवार वापरता आले कारण युवाने मला ते सादर करण्याचे स्वातंत्र्य सुरुवातीपासून दिले आहे. व्यक्तीच्या स्वातंत्र्याची संकल्पना हरवून युवाने मला काम करायला शिकविले नाही तर व्यक्तीचे स्वातंत्र्य जपून एका विशिष्ट चौकटीत शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याची कला युवाने मला दिली. जागतिकीकरणाच्या युगात विविध शहरातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीचे आकलन व्हावे म्हणून युवाने मला एक्सपोजर दिले, ज्यामुळे मी व्यापक दृष्टीने समाजाला सर्वांगीण दृष्टीकोनातून पारखू शकलो.

मला वाटते, युवामध्ये निवडला जाणारा प्रत्येक कार्यकर्ता हा हाडाचा कार्यकर्ता आहे. त्याची समाजाप्रती असणारी तळमळ, त्याची काम करण्याची इच्छा आणि दुरदृष्टीकोन पाहून त्याला इथे कामाची संधी मिळते. इथे मला खूप चांगली माणुसकी असणारी माणस मिळाली त्यामुळे मला इथे उत्साहाने, आनंदाने, हिरारीने अनेक कार्यक्रमात पुढाकार घेता आला आणि सहभागी होता आले. युवामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांकडे प्रत्येकाकडे एक वेगळेपण आहे आणि त्या वेगळेपनातून एक नाविन्यपूर्ण कृती जन्म घेत आहे. काळजी करणारे लोक, समजून घेणारे लोक, आधार देणारे लोक, आत्मविश्वास वाढविणारे लोक, प्रकल्पामध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक कामाला महत्व देणारे लोक येथील कार्यकर्त्यांचे मनोबल खचू न देता त्यांचा आत्मविश्वास वाढवतात आणि त्यांना प्रेरणा देतात. युवा ही एक अशी जागा आहे जिथे लोकांचा लोकांच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे. ज्ञानाच्या विकेंद्रीकरणाच्या द्रूष्टीकोनातून युवाचा सुरु असलेला प्रयास दिवसेंदिवस मजबूत आणि भक्कम होत असलेला आपल्याला दिसून येतो. मला नेहमी अस वाटत युवाचा एक संघर्ष आहे तो, समतेच्या आणि समानतेच्या विचारासाठी त्याचबरोबर तळागाळातल्या लोकांना सक्षम करण्यासाठी, लोकांना सेवा न देता त्यांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी, प्रामाणिक चळवळ उभी करण्यासाठी.

इथे रोज नवीन लोक भेटतात, विचार देतात, काही लोक जातात काही नवीन लोक येतात. विविध क्षेत्रातील कौशल्यपूर्ण लोकांना जोडण्यासाठी युवाचा हा प्रयत्न कायम सुरु राहील. इथे काही लोक युवाला आपली स्वतःचे जीवन समजतात, मला वाटत याच एका वाक्यात युवाबद्दल लोकांच्या मनात असलेले प्रेम किती आहे. हे प्रेम निरंतर राहण्यासाठी पोषक असणारे वातावरण कार्यकर्त्यांना कायम मिळत राहो, शाश्वत वस्त्या आणि शहरे युवाच्या प्रयत्नातून साकार होवोत हिच एक माफक अपेक्षा.

Namdeo Guldagad, Staff, YUVA

मै युवा के साथ १९९९ से जुडा हु. अभी 22 साल हो गए है| तब मै ज्यादा बोलता भी नहीं था, युवा के साथ तब मै अनेक कार्यक्रम में जाता था| जहा भी युवा का कार्यक्रम होता मै उस कार्यक्रम में जाने की पूरी कोशिश करता ठा| मै “कपास एकाधिकार “ में काम करता था|

युवा में २००३ में फेलोशिप पर नागपुर ऑफिस में काम करना चालु किया| युवा की वजह से मै बस्तियों में अलग अलग जगह पर जाता था| उसकी वजह से मुझे बस्तियों में पेहचान मिली| असंघटित मजूर तथा युवा बचत गट के माध्यम से लोगो से मै मिलना, बाते समझने लगा| युवा के फेलोशिप की वजहसे मुझे आर्थिक तथा सामजिक फायदा मिला| परिवार का भी साथ मिला| युवा पत संस्था-पतपेढ़ीद्वारा दिया हुआ कर्ज में घरको बनाने के लिए खर्च करता था उस वजह से मेरे घर में सुख शांति आयी|

में युवा के सभी डैरेक्टारो के साथ परिचित था| युवा के नागपुर के वास्ते अलग अलग फंड देकर नागपुर कार्यलय शुरू रखा| उन्समे में स्टाफ रहकर शहर विकास मंच, कष्टकारी महिला, बांधकाम मजदूरो के साथ काम किया, इस लिए युवा का साथ मुझे मिला, इस लिए में आगे बढ़ा, वंचित समूह युवा के मूल्योंद्वारा में आगे भी युवा के सहयोग से आगे बढूँगा| मुझे युवा हरदम आगे बढ़ने के लिए सहह्यता देगी एसी अशा करते है|

Shailendra Wasnik, Consultant, YUVA

मेरा नाम उर्मिला है और मैं शांति नगर क्रेडिट कोआपरेटिव मैं मैनेजर हु। जब युवा ने नागपुर मैं बचत घट के काम की शुरुआत की तब किसी को युवा पर भरोसा नहीं था। लेकिन धीरे धीरे हमें विश्वास हुआ की हमारे लिए बचत घट क्यूँ ज़रूरी है। युवा ने इसके लिए काफ़ी ट्रेनिंग, इक्स्पोज़र विज़िट करवाए। जिससे मेरे साथ साथ सारी महिलाओं का आत्मविश्वास बढ़ा और कुछ करने की इच्छा जागी। युवा का काम बस्ती मैं बहोत ही सराहनीय है और इसका जीता जागता उदाहरण युवा द्वारा बनायी गयी हमारी बैंक है। हमारी आर्थिक और सामाजिक परिस्तिथि को बढ़ाने मैं युवा एक मिशाल है। मैं युवा की ३५ वी वर्ष घाट के लिए बधाइयाँ देती हु। धन्यवाद

Urmila Badge, Former Staff, YUVA

My first interaction with YUVA was in 2006 when I participated in a six day youth workshop at YUVA Centre, Kharghar. The workshop gave me an opportunity to step out of my home for the first time in my life. Those six days proved to be one of the most enriching experiences of my life.

Following the youth workshop, I got another opportunity to participate in another project of YUVA’s, the Community Video Unit (CVU) project where I learnt film making. I have to say, that it was the first time ever that I touched the camera and my learnings taught me to operate the device which eventually encouraged me to shoot films in my community. Through the shooting of films, I got an opportunity to interact with people in my community, even the ones who I have never spoken to.

I was studying before I got associated with YUVA. I had failed my 10th grade examinations and it demotivated me to such an extent that I decided never to study again. But I still completed my post-graduation in Mass Communications, the credit of which goes to Mr. Anil Ingale who like a father, encouraged me to not lose hope and work hard to get ahead in life.

The work culture at YUVA is very family-like with absolutely no discrimination and thus, you never realise the hierarchy.

I am very thankful to Anil Ingale and YUVA who changed my perception towards life, built my confidence through several training workshops. I used to be a girl who was unable to voice out her opinions but now I can do so because of what I learnt at YUVA.

The relation I had with YUVA and the staff has only matured over the years. I know for a fact that if I am ever in need of help, all of the staff members, whether it is Anil Ingale, Mangesh Kamble, Sanjay Chaturvedi, Raju Vanjare, Neelima Mahadik, Charusheela Pawar, Sitaram Shelar or any of the others, they would always be ready to extend support.

I am very thankful to YUVA for everything and would heartily congratulate everyone at YUVA, wishing them all the best for the future.

Once again, many many congratulations on completing 35 successful years!

Cheers.

Zulekha Sayyed, Participant, Community Video Unit

अंधारातून प्रकाशाकडे नेत प्रगतीचा मार्ग दाखविणारी मी पाहिलेली व अनुभवलेली एकमेव सामाजिक संस्था म्हणजे ‘युवा’ होय. युवा हा संस्थेच्या नावाचा शोर्टफॉर्म असला तरी त्यात खूप मोठा अर्थ सामावलेला आहे. सलग ३५ वर्ष सामाजिक कार्यासाठी निरंतर कटिबद्ध असणारी आणि खारघर या ठिकाणी स्थित असलेली आमची सर्वांची युवा संस्था.

धन्यवाद , युवाला आणि युवाच्या कार्यकर्त्यांना कि, जे समाजातील सर्व थरातील लोकांसाठी, लोकांबरोबर, लोकांच्या अडी — अडचणींवर काम करतात. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करतात. एक महिला म्हणून मला युवा संस्थेचा खूप अभिमान आहे, कारण युवाने महिलांसाठी अनेक विषयांवर कार्य करून आत्मविश्वासाच्या पायावर उभी असलेली एक सक्षम महिलांची फौज धारावीमध्ये उभी केली आहे. सर्वप्रथम युवा पुरस्कृत ‘स्त्री मंचची’ स्थापना झाली. तिथूनच महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. महिलांच्या विश्वासाचा पाया रोवला गेला.

एकंदरीत समाजातील महिलांचे निरीक्षण करता त्यांच्याशी बोलता त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या आर्थिक व कौटुंबिक गरजा लक्षात घेता महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने धरावीमध्ये महिला बचत गट सुरु करण्यासाठी युवाने हालचाल सुरु केली. हा … हा… म्हणता अनेक म्हणजे १०० च्या पुढे बचत गट धारावीमध्ये सुरु झाले. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे अनेक सामाजिक, कौटुंबिक प्रश्न युवाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सोडविले गेले. “हाताला काम आणि कामाला दाम” या उद्देशाने युवाने काही महिलांना जेवण बनविण्याचे प्रशिक्षण दिले. यातूनच पुढे “मातृत्व सेवा सहकारी संस्थेचा” जन्म झाला. अनाथ, फुटपाथवर राहणाऱ्या आणि गरजू प्रशिक्षित महिलांना यात सामावून घेतले. त्यांच्या हाताला काम मिळाल्याने सक्षमीकरणास मदत झाली. धारावीमध्ये काही महिला बचत गटांना या दरम्यान अंगणवाडी पूरक पोषण आहाराचे टेंडर मिळाले. काही महिलांनी एकत्र येऊन जेवण बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. पुढे महिलांच्या वाढत्या गरजा, महिलांचे आत्यंतिक पाठबळ पाहता युवाची उत्तम साथ, मार्गदर्शन आणि अथक परिश्रमातून सन २००६ मध्ये धारावीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून उभी राहिली ती, “आकांक्षा महिला नागरी सहकारी पतसंस्था”. ही पतसंस्था महिलांची आकांक्षपुर्ती व गरजापूर्ती करणारी एक यशस्वी एकमेव पतसंस्था ठरावी म्हणून युवाने खूप सहकार्य केले. आजही युवा संस्था मार्गदर्शनाच्या माध्यमातून पतसंस्थेला खूप सहकार्य करत आहे.

युवाने महिला सक्षमीकरणासाठी खूप प्रयत्न केले. ते प्रयत्न सार्थकीही लागले. अनेकदा युवाने अनाथांना मदत केली व जीवनाचा योग्य मार्ग दाखविला. या परोपकारी युवा संस्थेला माझा सलाम ! ३५ वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.

Sunanda Mane, Member, Dharavi Stree Manch

YUVA would like to express heartfelt gratitude to all the people who have contributed to YUVA’s journey of 35 years.

For other instalments of the YUVA Meri Nazar Mein Series, see #1, #2, #4, #5

Leave a Reply