Skip to main content
GovernanceHabitatInformal WorkLivelihoods

कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेदरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील शहरी गरीबांच्या परिस्थितीचे केलेले

By April 24, 2021December 20th, 2023No Comments

महामारीच्या दुसर्‍या लाटेचे वेगाने संक्रमण वाढल्यामुळे, आम्ही १५ ते १८ एप्रिल २०२१ दरम्यान शहरी गरीबांच्या परिस्थितीचे जलद विश्लेषण करणारे एक सर्वेक्षण केले . या सर्वेक्षणात ४ एमएमआर शहरांमधील (मुंबई, नवी मुंबई, पनवेल आणि वसई-विरार) ३५ पेक्षा जास्त समुदायामध्ये (झोपडपट्टी, पुनर्वसन वसाहतीं, शहरी गावे, बेघर) राहणाऱ्या एकूण २९७ कुटुंबांचा (१४३२ व्यक्तींचा) समावेश होता. हा लेख प्रारंभिक निष्कर्षांचा थोडक्यात सारांश सादर करतो. कामातील नुकसान, वेतन आणि मूलभूत गरजांपर्यंत पोहचण्यात असमर्थता असे काही समान प्रवृत्तीकडे निर्देश करणारे मुद्दे या निष्कर्षात समोर येत आहेत. बर्‍याच घरातील लोक रोजगार चालु असल्याचे नोंदवतात, परंतु त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता भविष्याबद्दल अनिश्चिततेची नोंद दाखवत आहे . हे स्पष्ट आहे की कठोर लॉकडाऊनचा अर्थ सखोल वंचितपणा असेल, विशेषत: २०२० च्या लॉकडाउनमधून गरीब अद्यापही सावरलेले नाहीत. बरेचजण हाताला पडेल ते काम करत आहेत.

‘मी शेवटचं काम करुन १५ महिने झाले आहेत’, असं स्थानिक जत्रेत खेळणी विकून कमाई करणारे मुंबईचे संजय कुरेशी म्हणाले.

‘मी जर आज पैसे कमवले तरच आम्हाला आमचं पुढचं जेवण मिळेल आज घरी इतर कोणीही कमावती व्यक्ति नाही, आमच्याकडे रेशनकार्डही नाही’, असे वसईमधील रस्त्यावरील फेरीवाले प्रियंका कांबळे यांनी सांगितले.

‘माझ्या कुटुंबातील सदस्याने ही लस घेतली आणि त्यांना आता बरे वाटत आहे पण कोविडमुळे काम थांबले आहे’, असं मुंबईतील गृहिणी माधुरी सेडके म्हणाल्या.

सर्वेक्षणातील महत्त्वाच्या मुद्द्यांना थोडक्यात समजून घेण्यासाठी खालील सारांश वाचा –

सारांश: वाढती अनिश्चितता, एकेरी उत्पन्न मिळविणाऱ्या कुटुंबांच्या संख्येत वाढ, सरकारी कल्याणकारी योजनांमधून अनौपचारिक कामगारांची होणारी गळती, सरकारी रेशन मिळविण्यासाठी येणारी आव्हाने आणि बरेच काही

  • सर्वेक्षण केलेल्यापैकी फक्त १६ टक्के लोकांनीच मागील पूर्ण आठवडाभरात (८ एप्रिल पासून) काम केले आहे आणि ५९ टक्के लोकांना पुढच्या आठवड्यात काम मिळेल की नाही याची खात्री नाही.
  • जवळपास ५५ टक्के कुटुंबांतील एकच व्यक्ती सध्या काम करत आहे (कारण घरातील दुसऱ्या कमावणाऱ्या व्यक्ति ज्या मॉलमध्ये काम करत होत्या, घरकामगार होत्या, ड्राईवर होत्या, बांधकामगार होत्या त्या कामाच्या जागा बंद पडल्याने आणि वाहतुकीचा अभाव असल्यामुळे आता घरीच आहेत).
  • सर्वेक्षण झालेल्या बांधकाम कामगार, पथ विक्रेते, घरगुती कामगार आणि रिक्षा चालकांपैकी केवळ २५ टक्केच सरकारने जाहिर केलेल्या १५०० रुपयांच्या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत कारण त्यांच्या जवळ नोंदणीचा पुरावा आहे.
  • बेघर, ट्रान्सजेंडर समुदायाचे सदस्य आणि एकल पालक सर्वात असुरक्षित आहेत, अधिकतर आधीच काम करण्यासाठी / मिळविण्यास असमर्थ आहेत आणि येत्या आठवड्यात त्यांना काम मिळेल की नाही याची खात्री नाही.
  • गेल्या २ महिन्यांत, रेशनच्या कोट्यानुसार केवळ ४६ टक्के लोकांना रेशन मिळाले आहे परंतु ६४ टक्के लोक रेशनकार्ड असल्याचा उल्लेख करत आहेत.
  • ज्या मुख्य आव्हानांना सामोरे जावे लागत आहे : रोजगार बंद होणे आणि संचारावर निर्बंध (प्रत्येकी ६२ टक्के), कमाईचे नुकसान (३८ टक्के), घरी कमी अन्न असणे (३३ टक्के), रेशन दुकानातून रेशन न मिळणे (२२ टक्के), सध्याच्या आजारांवर वैद्यकीय उपचार घेण्यास असमर्थता (१५ टक्के), कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे (९ टक्के) आणि इतर घटक (३९ टक्के).
  • मुख्य भीती आणि समुदायाच्या संदर्भात होणारे बदल — त्वरित लॉकडाऊन (६६ टक्के), आपल्या गावी परत जाणारे लोक (५४ टक्के), पुरेसे खाणे नसणे (५६ टक्के), कोव्हीडची भीती (५२ टक्के) आणि इतर घटक (५ टक्के).
  • २५ टक्के लोकांनी (४५ वर्षांपेक्षा जास्त वयाची लोकं असलेल्या कुटुंबानी) लस संदर्भात शासनाने अधिकृतपणे त्यांच्याशी संपर्क साधला असल्याचे नमूद केले, तर केवळ ४४ टक्के लोकांनी लस घेण्यात रस असल्याचे सांगितले.

प्रतिसाद दिलेल्या व्यक्तींचे कामाचे स्वरूप आणि मिळकत

  • प्रतिसाद दिलेल्या व्यक्ती प्रामुख्याने अनौपचारिक क्षेत्रात ४० पेक्षा अधिक विभिन्न प्रकारच्या व्यवसायांमध्ये नोकरी करत असल्याचे दिसते
  • बहुतेक प्रतिसादकर्ते घरकामगार किंवा बांधकाम कामगार (प्रत्येकी २३ टक्के), पथविक्रेते (१४ टक्के) गृहिणी (११ टक्के), आणि प्रत्येकी ५ टक्के खासगी क्षेत्रात, गृहउद्योग, रिक्षा चालक, भिकारी तसेच विद्यार्थी आहेत.
  • ४२ टक्के लोक रोजंदारीवर काम करतात, तर ३४ टक्के लोक मासिक मिळकत घेतात आणि ८ टक्के साप्ताहिक वेतन मिळवतात. १ टक्के लोक असे आहेत ज्यांचे २ रोजगार असून त्यांच्याकडे रोजंदारी व मासिक पगाराच्या नोकऱ्या आहेत. १ टक्के लोक असे आहेत ज्यांनी असे सांगीतले आहे की मजुरीचा प्रकार हां त्यांच्या कामावर आधारित आहे. १५ टक्के लोकांनी ‘आर्थिक मिळकर नाही’ असे उत्तर दिले आहे (मुख्यत: गृहिणी व विद्यार्थी यांचा समावेश आहे)

कलीम खान हे वसईचे प्लंबर आणि पेंटर आहे. त्यांचा काम मिळविण्याची मुख्य जागा ‘नाका’ आहे ( विशिष्ट जंक्शनवरील कामगार नाके जेथे कामगार कामासाठी जमतात ). तथापि, गेल्या आठवड्यात त्यांना फक्त दोन दिवस काम मिळाले आहे आणि तेही फोनद्वारे मिळाले. त्यांना असे वाटते की पुढील सात दिवस काम मिळण्याची केवळ ५० टक्के शक्यता आहे. ते म्हणतात, ‘माझे दोन मुलगे देखील बांधकाम कामगार आहेत पण ते सुद्धा सध्या बेरोजगार आहेत’.

भाईंदर ते बोरिवली येथे दररोज प्रवास करून भीक मागून आपले जीवन जगणारी चंपा बेन ही ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे. सध्या कोणतेही उत्पन्न नाही, कौटुंबिक आधार नाही आणि कोणतीही सामाजिक सुरक्षितता नाही, चंपा घराचं भाडं देऊ शकत नाही, तिच्याकडे अन्न व जीवनावश्यक वस्तूंसाठी पुरेसे पैसे नाहीत.

मागील आणि पुढे येणाऱ्या आठवड्यात कामाच्या संभावना

  • मागील ७ दिवसांत केवळ १६ टक्के लोक पूर्ण आठवड्यात काम करू शकले होते, तर २७ टक्के लोकांना कोणतेही काम मिळू शकले नाही आणि ४१ टक्के लोकांना आठवड्यात काही दिवस काम करण्यास मिळाले. या प्रतिसादासाठी १५ टक्के लोकांनी ‘लागू नाही’ असे उत्तर दिले.
  • पुढच्या ७ दिवसांकडे पाहता ३० टक्के लोकांनी त्यांना काम मिळेल की नाही याची खात्री नहीं असे नमूद केले आहे, तर २९ टक्के म्हणाले की त्यांना काम मिळणे अशक्य आहे. १८ टक्के लोकांनी काम मिळण्याची ५० टक्के शक्यता असल्याचे नमूद केले आहे, तर ८ टक्के लोकांना येत्या आठवड्यात नोकरी असेल अशी खात्री नमूद केली. या प्रश्नासाठी १५ टक्के लोकांनी ‘आर्थिक मिळकर नाही’; असे उत्तर दिले.
  • जवळपास ५५ टक्के कुटुंबांना एकेरी कमावणारे व्यक्ति कुटुंब बनण्यास भाग पडले आहे. (कारण घरातील दुसऱ्या कमावणाऱ्या व्यक्ति ज्या मॉलमध्ये काम करत होत्या, घरकामगार होत्या, ड्राईवर होत्या, बांधकामगार होत्या त्या कामाच्या जागा बंद पडल्याने आणि वाहतुकीचा अभाव असल्यामुळे आता घरीच आहेत).

मुंबईत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे आणि आपल्या कुटुंबातील एकमेव कमावणारी व्यक्ति, विमल चव्हाण यांनी नमूद केले की, आता प्रवास करता येत आहे त्यामुळे पगार मिळत आहे पण जर पूर्णपणे लॉकडाउन लावण्यात आला तर त्यांना कामावर जाता येणार नाही. सध्या तो आपल्या वर्कसाईटवर सायकलने जात आहे कारण त्याला ट्रेन किंवा बस वापरण्याची परवानगी नाही. त्यांना भीती आहे की ते आपलं घराचे भाड़े आणि पोटापाण्याचा प्रश्न कसा पूर्ण करतील. परिस्थिती आणखी बिकट झाल्यास पुढील महिन्यात त्याचा संपूर्ण पगार मिळेल की नाही याचीही त्यांना खात्री नाही.

‘माझी पत्नी पूर्वी घरकामगार म्हणून काम करायची आणि तिच्या कमाईने कुटुंबाच्या गरजा भागायच्या. पण व्हायरस पसरल्यामुळे, ज्या सोसाइटी मध्ये ती कामासाठी जात होती त्यांनी घरकाम करणार्‍यांच्या प्रवेशास बंदी घातली आहे, म्हणून आता मी एकमेव कमविणारा व्यक्ति आहे’, असे नवी मुंबई येथील पेंटर राजेश तायडे यांनी सांगितले. मागील आठवड्यात ते काम करण्यास सक्षम होते, पण येत्या आठवड्यात ते पैसे कमावू शकतील की नाही हे त्यांना माहित नाही.

असुरक्षित गट: बेघर, ट्रान्सजेंडर व्यक्ती, एकल-पालक

  • बेघर आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती, जे मोठ्या प्रमाणावर कचरा वेचण्याचे आणि भीक मागण्याचे काम करतात, त्यांना गेल्या आठवड्यात केवळ काही दिवसांसाठी काम करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी बर्‍याच जणांना येत्या आठवड्यात काम करण्यास मिळेल की नाही याची खात्री नाही. केवळ एका सदस्याने संपूर्ण आठवड्यात काम केल्याची नोंद केली.
  • एकल पालकांनी नोकरी बद्दलची अनिश्चितता आणि नोकरी गमावण्याची भीती देखील व्यक्त केली.
  • काम न करू शकण्याची कारणे बाजारपेठ बंद होण्यापासून, भिक मागण्यासाठी गाड्या आणि आसपासच्या भागात प्रवेश न घेण्यापर्यंत आहेत, ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि कचरा पुनर्वापर करणाऱ्या व्यक्तींनी कामासाठी बाहेर पडल्यावर पोलिसांपासून त्रास होण्याची भीती देखील काम न करता येण्याचे कारण म्हणून नमूद केले आहे.

सीमा थोरात एकल-पालक आहेत आणि घरातील ५ व्यक्ति त्यांच्यावर निर्भर आहेत. गेल्या आठवड्यात त्या आपले कचरा पुनर्वापराचे काम चालू ठेऊ शकल्या परंतु येत्या आठवड्यात त्या आपलं काम सुरु ठेऊ शकतील की नाही याची त्यांना खात्री नाही. ‘आमच्या रेशनकार्डमध्ये काही अडचण आहे म्हणून आम्ही रेशनच्या दुकानावारून रेशन नाही घेऊ शकत. येत्या काळात आपण कसे पोट भरू ही माझी सर्वात मोठी चिंता आहे’ असे त्यांचे म्हणने आहे.

शशिकला ही तिन लोकांच्या परिवारातील एकमेव कमावणारी एकल पालक आहे. सध्या ती घरकामगार म्हणून काम करत असून क्लिनिकमध्ये साफसफाईची नोकरी सुद्धा करते, गेल्या महिन्यापर्यंत बेरोजगार असल्याने तिने नुकतच हे काम सुरु केले आहे. लॉकडाऊन झाल्यास आपले काम पुन्हा बंद होइल याची तिला सर्वात जास्त काळजी वाटते आहे. ती म्हणाली, ‘माझ्याकडे नोकरी नसेल तर मी माझ्या मुलांना कसे खाऊ घालू’. तिच्यावर टायफाइडचे उपचारही सुरू आहेत आणि पैशाच्या अडचणीमुळे तिला आता औषधे खरेदी करता येत नाहीत.

शासनाने ज़ाहिर केलेल्या मदतकार्य कामगारांपर्यंत किती पोहचत आहे

  • महाराष्ट्र शासनाने नुकतीच नोंदणीकृत बांधकाम कामगार, पथ विक्रेते, घरगुती कामगार आणि रिक्षा व टॅक्सी चालकांना १५०० रुपयांच्या एक वेळ मदतीची घोषणा केली आहे.
  • सर्वेक्षण केलेल्या ५१ बांधकाम कामगारांपैकी केवळ ४ कामगार नोंदणीकृत आहेत (आणखी २ अर्ज प्रक्रियेत आहेत), ३१ पथविक्रेत्यांपैकी ११ जणांची नोंद झाली आहे, ५० घरकाम कामगारांपैकी १३ नोंदणीकृत आहेत आणि १६ पैकी १० वाहन चालक नोंदणीकृत आहेत.
  • सर्वेक्षण केलेल्या कामगारांपैकी केवळ २५ टक्के कामगारच या मदतीसाठी पात्र ठरतील.

सार्वजनिक वितरण प्रणाली सर्वसमान्यापर्यंत किती पोहचत आहे

  • जिथे ६४ टक्के लोकांनी रेशनकार्ड असल्याचे नमूद केले आहे तिथे बर्‍याच जणांनी असे सांगितले की त्यांचे रेशनकार्ड त्यांच्या गावातल्या घराच्या पत्त्यावर होते, ते सध्या ब्लॉक केलेले आहेत किंवा ते भाड्याने राहत असल्याने शहरात रेशनकार्ड बनविण्यास असमर्थ आहेत
  • ४६ टक्के लोकांनी गेल्या 2 महिन्यांत रेशनच्या कोट्यानुसार रेशन मिळाल्याचा उल्लेख केला आहे

नवी मुंबईची एक पथविक्रेता मंगला देसाई गेल्या आठवड्यात काम करू शकली नाही आणि येत्या आठवड्यातही ती काम करू शकेल की नाही याची खात्री नाही. ती म्हणाली, ‘‘ माझा मुलगा फळांची विक्री करतो, पण तो घरीच बसला आहे’’, ती म्हणाली की त्यांच्या सध्याच्या परिस्थितीला लक्षात घेउन त्यांना राशन पण पुरविले पाहिजे आणि त्यांना काम करण्याची मुभा सुद्धा देण्यात आली पाहिजे.

भीती आणि आव्हाने

  • ज्या मुख्य आव्हानांना सामोरे जावे लागत आहे : काम कमी होणे आणि संचारावर निर्बंध (प्रत्येकी ६२ टक्के), कमाईचे नुकसान (३८ टक्के), घरी कमी अन्न असणे (३३ टक्के), रेशन दुकानातून रेशन न मिळणे (२२ टक्के), सध्याच्या आजारांवर वैद्यकीय उपचार घेण्यास असमर्थता (१५ टक्के), कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे ( ९ टक्के) आणि इतर घटक (३९ टक्के).
  • मुख्य भीती आणि समुदायाच्या संदर्भात होणारे बदल — त्वरित लॉकडाऊन (६६ टक्के), आपल्या गावी परत जाणारे लोक (५४ टक्के), पुरेसे खाणे नसणे (५६ टक्के), कोव्हीडची भीती (५२ टक्के) आणि इतर घटक (५ टक्के).

‘मला ऑनलाइन काम करण्याची मुभा आहे, म्हणून मी शहरातच राहिलो आहे अन्यथा मीसुद्धा घरी जाण्याचा प्रयत्न केला असता. परिस्थिती दिवसांदिवस बिकट होत चालली आहे’, असे वसईचे शिक्षक आदित्य जाधव यांनी सांगितले.

नवी मुंबईतील एका रिक्षा चालकाने आपल्या वस्तीतील अंदाजे ३० कुटुंबे आपल्या गावी आधीच कशी रवाना झाली आहेत याबद्दल सांगितले.

“मार्च ते मे हा हंगाम माझ्यासाठी व्यस्त वेळ असतो, परंतु आता सर्व काम थांबले आहे आणि घरगुती खर्च ( विजेचे बील व पाण्याचे बिल, घरभाडे इ.) कसे भरायचे याची मला चिंता आहे,” असे मुंबई मध्ये टेलर म्हणून काम करणारे सलीम खान म्हणाले. गेल्या आठवडाभर काम मिळाले नाही आणि येत्या आठवड्यात देखिल कोणत्याही ऑर्डरची अपेक्षा दिसत नाही. चार जणांच्या कुटुंबातील एकमेव कमाई करणारी ही व्यक्ती, स्वतःला खूप असुरक्षित सांगते.

लसीकरण जागरूकता, तयारी आणि संकोच याबद्दल

  • २५ टक्के लोकांनी (४५ वर्षांपेक्षा जास्त वयाची लोकं असलेल्या कुटुंबानी) लस संदर्भात अधिकृतपणे त्यांच्याशी संपर्क साधला असल्याचे नमूद केले, तर केवळ ४४ टक्के लोकांनी लस देण्यात रस असल्याचे सांगितले.
  • लस न घेण्याची सामान्य कारणे म्हणजे, त्याबद्दल ऐकलेल्या अफवा (३८ टक्के), त्यापर्यंत पोहचण्याची प्रक्रिया माहित नाही (३७ टक्के), दुष्परिणामांबद्दल काळजी (२२ टक्के), लस घेतल्यानंतर वाईट अनुभव आले आहेत असे ऐकले आहे (५ टक्के) आणि इतर कारणे (२३ टक्के)लोकानी दिली .

आपल्या कुटुंबातील एकमेव कमावणारा वसई येथील चहा विक्रेता अरुण सरकटे म्हणाला, ‘मला लस घेण्याची प्रक्रिया माहित नाही’. त्यांनी लसीकरण जागरूकता आणि नोंदणीसाठी मदतीची गरज असल्याचे सांगितले, विशेषत: त्यांच्या घरातील ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सदस्यासाठी आवश्यक आहे असे सांगीतले

मार्च २०२० मध्ये, बिघडलेली परिस्थिती पाहून, युवाने मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ४ शहरांमधील ३४ समुदायांमध्ये शीघ्र मूल्यांकन केले. लोकांच्या अन्न आणि काम मिळविण्याबाबत जे मुद्दे समोर आले ते चिंताजनक होते. आपण मुल्यांकना बद्दल आणि वर्षभर चाललेल्या प्रतिसादाबद्दल आणि पुनर्वसन कार्याबद्दल जे अजुनही चालू आहे अणि असच अविरत चालू राहिल याबद्दल इकडे वाचू शकता

Leave a Reply