Skip to main content
Child Rights

कोरोना, टाळेबंदी आणि वस्तीपातळीवरील मुलांचा संघटितपणे अर्थपूर्ण सहभाग

By July 26, 2021December 20th, 2023No Comments

बाल अधिकार संघर्ष संघटन हे वस्तीपातळीवर कार्यरत मुलांचे संघटन आहे, मुलांचा अर्थपूर्ण सहभाग या दृष्टीने बाल अधिकार संघर्ष संघटन गेली अनेक वर्षे मुंबई व नवी मुंबईतील अनेक वस्त्यांमध्ये मुलांसोबत कार्यरत आहे. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की गेल्या वर्षी कोविड 19 या महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे, भारतात ही गेल्या वर्षी कोरोना चा प्रसार होवू नये म्हणून शासनाने टाळे बंदी घोषित केली आणि सगळं काही ठप्प झालं,आम्हा मुलांच्या शाळा बंद झाल्या त्या आज दीड वर्ष होवून ही सुरू झाल्या नाहीत,मुले घरात कोंडली गेली अशावेळी या कोरोना काळात बाल अधिकार संघर्ष संघटन ने वस्तीतील मुलांसाठी ऑनलाईन च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले,मुलांशी संवाद केला, त्यांच्याशी ऑनलाईन माध्यमातून चर्चा सत्र घेतले, यातील पुढील महत्वाचे उपक्रम मी इथे मांडतोय.

प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हते त्यामुळे ऑनलाईन च्या माध्यमातून सेशन आयोजित करण्यात आले होते. त्यात मुलांच्या संबंधित मुद्द्यांवर ऑनलाईन माध्यमातून चर्चा सत्र आयोजित केले गेले. कारण कोरोना काळात ही मुलांना त्यांच्या सुरक्षिततेची, विकासाची माहिती त्यांच्या पर्यत पोहोचली पाहिजे हे आमचे उद्दिष्टय होते.

तसेच युवा संस्थेच्या माध्यमातून ही मुलांसाठी ऑनलाईन ‘समर कॅमप’ आयोजित करण्यात आला होता. त्या माध्यमातून लाॅकडाऊन मध्ये घरीच असलेल्या आणि कंटाळलेल्या मुलांसाठी मनोरंजन होईल व ते नवनवीन उपक्रम शिकतील, समजून घेतली हा आमचा उद्देश होता. ह्या समर कॅम्प मध्ये निव्वळ मुंबई व नवी मुंबईतील च नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्राबाहेरील राज्यातून ही मुले सहभागी झाली होती, या समर कॅम्प मध्ये बाल अधिकार संघर्ष संघटन चे बाल प्रतिनिधी देखील सहभागी होते.

ऑनलाइन समर कॅम्प च्या माध्यमातून मिळालेल्या मुलांशी संबंधित वेगवेगळ्या उपक्रमामध्ये बाल अधिकार संघर्ष संघटनेच्या बाल प्रतिनिधीसोबत व त्यांच्या ग्रुप सोबत चर्चा करण्यात आली की आपण आपल्या वस्ती मध्ये असलेल्या समस्याला घेऊन काय करू शकतो किंवा मुलांना संबंधित असलेल्या समस्यावर आपण आपल्या वस्तीमध्ये कशाप्रकारे जनजागृती आणू शकतो. या चर्चेच्या माध्यमातून बाल अधिकार संघर्ष संघटनेच्या बालसाथी ने ठरवले की आपण 12 जुन आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिनानिमित्त आपण आपल्या वस्तीमध्ये बालकामगार विरोधी दिनाच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम घेऊ शकतो जेणेकरून आपली वस्ती बाल मजुरीमुक्त वस्ती होईल. यावर चर्चा केल्यानंतर बाल अधिकार संघर्ष संघटनेच्या बाल साथींनी ठरवले की आपण 12 जुन ते 20 जून हा पुर्ण आठवडा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी आठवडा म्हणून राबवूया, त्यामध्ये प्रत्येक मुलाचा सहभाग असेल आणि बालकामगार विरोधी दिन या विषयावर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या वस्तीतील मुलांसोबत जनजागृती करूया. ह्या संपूर्ण आठवड्यामध्ये मुलांनी बाल कामगार विरोधी दिनाच्या अनुषंगाने अनेक उपक्रम राबवले ज्यात डान्स, निबंध, भाषण, गाणी, नाटक, चर्चासत्र, फिल्म स्क्रीनिंग हे संपूर्ण उपक्रम वस्तीतील मुलांचा सहभाग घेऊन करण्यात आले.

संपूर्ण आठवडा हा मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने व यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतर मुलांमधील असलेली कौशल्य-कला ह्या गटातील बाल लिडर्स ना माहीत झाले की कशाप्रकारे मुले सहभाग घेऊन, चांगल्या पद्धतीने पुढाकार घेऊन वस्ती पातळीवर जनजागृती करू शकतात. त्यामुळे गटप्रमुख यांनी ठरवलं की मुलांमधील असलेले कौशल्य त्यांनी घेतलेला पुढाकार, नेतृत्वबाबतची भूमिका यावरती आपण एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करू शकतो ज्यामध्ये लीडरशिप या विषयावरती वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊन मुलांमधील लिडरशिप कशी विकसित करता येईल व कशा पद्धतीने ते नेतृत्वाच्या भूमिकेतून वस्तीमध्ये बदल करण्याचा दृष्टीने जनजागृतीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडू शकतात.

या अनुषंगाने गट प्रमुखांनी ठरवलं की दिनांक 29 जून 2021 रोजी मानखुर्द, लल्लूभाई कंपाउंड येथील विश्वभुषण बुद्धविहार येथे मुलांसोबत लीडरशिप या विषयावर सत्र घेऊन मुलांना लीडर म्हणजे काय, लीडर ची भूमिका काय असते, लीडर चे कौशल्य काय असते तसेच लीडर कसा असला पाहिजे या सर्व मुद्द्यांना घेऊन मुलांसोबत सत्र आयोजित करण्यात आले त्यामध्ये मुलांसोबत लिडरशिप ला घेऊन ऍक्टिव्हिटीज घेण्यात आल्या. साठेनगर आणि लल्लूभाई कंपाउंड मधील बिल्डींग नंबर 63 च्या बाल साथींसोबत हे सत्र घेण्यात आले.

या सत्रात ज्या ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या त्या पुढीलप्रमाणे आहेत

पहिली एक्टिव्हिटी : Pass The Ball- चेंडू पास करणे

यात एक लीडर निवडून तो आपल्या गटाला आपले गोल पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे नियोजन करतो याबाबत होते. यात टीम लिडर ने टीम वर्क कसे करावे याबाबत मेसेज देण्यात आला.

दुसरी ऍक्टिव्हिटी : (Right Way) योग्य दिशा

या Activity मध्ये दोन गट तयार करण्यात आले, ज्यात गटातून एका सदस्याला निवडण्यात आले, जो सदस्य निवडण्यात आला त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली, त्या सदस्यांच्या समोर मार्गावर काही कागदाचे तुकडे टाकण्यात आले, त्या सदस्याला त्या कागदाच्या तुकड्यावर पाय न ठेवता किंवा पाय न लागता पुढे जायचे आहे. त्या सदस्याला त्या गटातील इतर सदस्य योग्य दिशेला जाण्यासाठी मार्गदर्शन करतील जेणेकरून त्या सदस्याचा पाय कागदाच्या तुकड्यावर पडणार नाही आणि तो सदस्य योग्य दिशेने पुढे जाईल.

तिसरी एक्टिव्हिटी: Types Of Leader’s (नेतृत्वाचे प्रकार)

या Activity साठी तीन गट तयार करण्यात आले आणि तीन लिडर निवडण्यात आले.

पहिल्या लिडर ला आपल्या सगळ्या साथी सोबत चर्चा विमर्श करून, त्यांच्या सगळ्यांची मते जाणून घेऊन, त्यांच्यासोबत काम करायचे आहे असे सांगण्यात आले.

दुसऱ्या लिडर ला आपल्या सहभागी साथींना काहीही न बोलता त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करू द्यायचे आहे हे सांगण्यात आले.

तिसऱ्या लिडर ला हुकूमशाही पद्धतीने वागण्यासाठी सांगितले आहे.

अशा पद्धतीने तिन्ही लिडर्स ने आपापल्या ग्रुप मध्ये जावून त्यांना ज्या प्रकारच्या लिडर ची भूमिका दिली आहे त्या प्रमाणे ऍक्टिव्हिटी घ्यायच्या होत्या त्या तशा पद्धतीने त्यांनी ऍक्टिव्हिटी घेतल्या.

या ऍक्टिव्हिटी नंतर गटातील सहभागी साथींना विचारण्यात आले की त्यांच्या लिडर ने त्यांच्यासोबत कशाप्रकारे वागणूक दिली आणि त्यावर त्यांची काय मते आहेत. यावर सगळ्या सहभागी साथींनी आपल्या ग्रुप लिडर बाबत ची मते सांगितली. मग शेवटी त्यांना विचारण्यात आले की त्यांना कुठल्या प्रकारचा लिडर हवा आहे, यावर सगळ्या सहभागी साथींनी पहिल्या प्रकारच्या लिडरशिप ला पसंदी दिली, जो लिडर सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांची मते घेऊन एकत्रित काम करण्यावर भर देतो, जबाबदारीने वागतो आणि इतरांची ही जबाबदारी घेतो अशा प्रकारचे नेतृत्व खूप महत्वाचे आहे असे मत मांडले.

शेवटी सहभागी सदस्यांच्या दोन रांगा तयार करून प्रत्येकाच्या पाठीवर पेपर लावून जे त्यांना समजले आहे ते त्यांनी त्यावर लिहावे हा उपक्रम घेण्यात आला.

अशा पद्धतीने लिडरशिप ला घेऊन सत्र घेण्यात आले.

या सत्राला सागर रेड्डी याने मार्गदर्शन केले. या सत्राला यशस्वी करण्यासाठी बाल साथी समरिन शाह, रुपेश सुतार, शिमोन पाटोळे यांनी सहकार्य केले. तसेच वस्ती पातळीवरील बाल संरक्षण समिती सदस्य (CCPC MEMBER): उषा ताई यांचे ही महत्वाचे योगदान राहिले.

– शिमोन पाटोळे (बाल अधिकार संघर्ष संघटन )

Leave a Reply