Skip to main content
Child RightsYUVA

युवा चाईल्ड लाईन च्या वतीने बाल अधिकार आणि चाईल्ड लाईन 1098 बाबत जनजागृती

By , November 13, 2021August 22nd, 2023No Comments

गोवंडी परिसरात मुलांवर होणारे शोषणाचे प्रकार सातत्याने वाढताना दिसत आहेत, हे रोखण्यासाठी आणि या बाल शोषणाच्या संदर्भात नेमकं काय करावं याविषयी नागरिकांना, पालकांना जनजागृती व्हावी या या दृष्टीने गोवंडी पश्चिम या विभागात मुलांसंदर्भातील चाईल्ड लर्निंग सेंटर चालवणाऱ्या कारुण्य ट्रस्ट या संस्थेने वय वर्ष १२ ते १८ या वयोगटातील मुलांचे पालक आणि वय वर्ष ६ ते ११ अशा दोन गटांतील मुलांच्या पालकांसोबत बाल अधिकार व चाईल्ड लाईन 1098 बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी त्यांनी युवा चाईल्ड लाईन ला आमंत्रित केले, त्यानुसार दिनांक २८/१०/२१ रोजी गोवंडी, जाफरी परिसर या याठिकाणी बाल अधिकार व चाईल्ड लाईन 1098 बाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सदर जनजागृती कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आले.

कार्यक्रमातील पहिले सत्र सकाळी ११:३० ते दुपारी १:०० या वेळेत घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीचा गट हा वय वर्ष १२ ते १८ या वयोगटातील मुलांचे पालक (आई) यांच्यासोबत घेतला. या सत्रात ४५ महिलांचा आणि १० लहान मुलांचा सहभाग होता. सत्रात पुढील मुद्द्यांवर मांडणी करण्यात आली.

  • सत्राच्या सुरुवातीला युवा संस्थेबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली
  • त्यानंतर सर्व प्रथम मूल कोणाला म्हणायचं या विषयी महिला वर्गाकडून माहिती घेतली. यावरून त्यांच्या वस्तीती चाईल्ड लाईन ची किती जनजागृती आहे याची माहिती मिळाली.
  • मूल कोणाला म्हणायचं याची स्पष्टता आल्यानंतर मुलांना अधिकार असतात की नाही आणि असतात तर ते कोणते यावर सविस्तर चर्चा केली.
  • मग आपण लहान मुलांचे अधिकार कोणकोणते आहेत या विषयावर महिला वर्गाला माहिती सांगितली.
  • मुलांच्या गरजेच्या गोष्टी कोणत्या आणि चैनेच्या गोष्टी कोणत्या या गोष्टींचे वर्गीकरण करून महिलांसोबत यातला फरक स्पष्ट केला.
  • महिलांसोबत आपण लहान मुलांच्या अधिकारांविषयी चर्चा झाल्यानंतर चाईल्ड लाईन ची ओळख आणि माहिती या विषयाकडे वळलो… यामध्ये आपण चाईल्ड लाईन ही संकल्पना कशी तयार झाली, आणि याची सुरुवात कशाप्रकारे झाली या चाईल्ड लाईन च्या इतिहासाविषयी तसेच चाईल्ड लाईन ही सेवा कशाप्रकारे काम करते या बाबत माहिती सांगितली.
  • लहान मूल व त्याचे पालक यांना कोविड परिस्थितीमध्ये शासनाच्या मुलांसंदर्भातील बालसंगोपन योजना आणि संजय गांधी निराधार योजना याची सविस्तर माहिती आणि कार्य सांगण्यात आले.

यानंतर विषयासंदर्भात महिलांचे काही प्रश्न आले, जसे:

  1. मुलांचे आणि मुलींची लग्नासाठी ची वयाची नेमकी अट काय,
  2. जी मुले प्लास्टिक जमा करून विकतात त्यांचे प्रश्न
  3. जी मुले कारखान्यामध्ये तासंतास काम करतात त्यांचं भविष्य काय,
  4. बरीच मुले १५ ते १९ या वयातच वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जातात, त्यांना कशी मदत करता येऊ शकते.
  5. एकल पालक असणाऱ्या मुलांसाठी बालसंगोपन योजना आणि प्रक्रिया काय असते,

अशा विविध प्रश्नांना उत्तरे देऊन उपस्थित महिला आणि मुलांना मार्गदर्शन केले,त्यांचे शंका आणि समज यांचे निरसन केले.

कार्यक्रमाचे दुसरे सत्र हे दुपारी २:०० ते ४:०० या दरम्यान वय वर्ष ६ ते ११ या वयोगटातील मुलांच्या पालकांसोबत ( महिला) झाले. या सत्रामध्ये ५८ महिलांचा आणि ८ लहान मुलांचा सहभाग होता. दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवातीला पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

  • सुरुवातीला युवा संस्था आणि युवा संस्थेच्या कामाबद्दल माहिती देण्यात आली.
  • मूल कोणाला म्हणायचं यावर चर्चा केली.
  • यानंतर चाईल्ड लाईन ची ओळख आणि चाईल्ड लाईन चा इतिहास याची माहिती आपण महिलांना दिली.
  • १०९८ ही राष्ट्रीय आपत्कालीन सेवा कशाप्रकारे कार्य करते. या कार्याची माहिती दिली.
  • उपस्थित पैकी एका महिला आणि एका मुलाला 1098 dial करून Childline contact centre च्या प्रतिनिधी सोबत संवाद घडवून आणला .
  • चाईल्ड लाईन च्या संपूर्ण कामाची माहिती मिळाल्यानंतर आपण कोमल हा लघुचित्रपट दाखवला, या मधून सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श बाबत माहिती सांगण्यात आली.
  • यानंतर आपण महिलां व लहान मुलांचे अधिकार अधिकार कोणते यावर प्रश्न विचारून बाल अधिकारांची माहिती दिली. नंतर सत्र संदर्भात महिलांचे प्रश्न घेतले.
  1. मुलांचे अधिकार सोबतच किशोरवईन मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्या देखील सांगिल्या गेल्या पाहिजे,
  2. मोबाइलचा अतिवापर टाळला पाहिजे,
  3. पालकांचे मुलांच्या सोशल मीडिया वापरावर लक्ष असले पाहिजे
  4. पालकांना आणि मुलांना आपल्या वस्तीमधील असुरक्षित जागांची माहिती असली पाहिजे, जेणेकरून खबरदारी बाळगता येईल.
  5. बाल शोषणाच्या घटना पोलीस, childline १०९८ ला कळवल्या पाहिजेत.

शेवटी भविष्यात अशा प्रकारे अनेक जनजागृती कार्यक्रम आयोजित करून मुलांसाठी हा परिसर सुरक्षित करण्यासाठी युवा चाईल्ड लाईन ने योगदान दयावे असे आवाहन करून कारुण्य ट्रस्ट च्या वतीने युवा संस्थेचे चे आभार मानून महिलांनी बनवलेल्या पेपर बॅग युवा चाईल्ड लाईन च्या मेंबर ना भेट म्हणून देण्यात आल्या.

अशाप्रकारे बाल अधिकार आणि चाईल्ड लाईन 1098 बाबत जनजागृती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply