वंचित दुर्लक्षित समाज हा शिक्षणापासून दूर असल्याने त्यांना उपदेश करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एका सभेत सांगितले की, “शिक्षण घेणे आवश्यक आहे. शिक्षण घेतले तरच समाज जागृत होईल. बंधुंनो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,” असा मंत्रच त्यांनी दिला.संघर्ष या शब्दात मोठी शक्ती आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात नेहमी हा संघर्ष सुरुच असतो. या संघर्षाची आपल्या सोप्या भाषेत व्याख्या करायची म्हटल तर एखादे ध्येय प्राप्तीसाठी केलेला प्रयत्न, ध्येय गाठण्यासाठी त्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक समस्या, अडचणीं, आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण जो त्रास सहन करून केलेल्या कृती, केलेला प्रयत्न म्हणजेच संघर्ष होय. अशाच एका संघर्षाबद्दल आपण आज समजून घेणार आहोत. हा संघर्ष मुलांच्या समूहान केला आहे. काय होते त्याचं ध्येय? त्या ध्येय प्राप्ती साठी कोणत्या समस्या, अडचणीं आणि आव्हानांचा सामना त्यांना करावा लागला?
या संघर्षाची सुरुवात मानखुर्द मधील लल्लुभाई कंपाऊंड या पुनर्वसन वसाहत मध्ये २००४ या वर्षापासून झाली.पुनर्वसन च्या आधी या ठिकाणी लल्लुभाई नावाच्या मालकाची येथे अल्युमिनियम कंपनीची जागा होती.राज्य सरकारने ने ती जागा त्त्यांच्या कडून खरेदी केली.पण या जागेची ओळख लल्लुभाई कंपाऊंड म्हणूनच राहिली. ह्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना अंतर्गत एस. वी पटेल आणि हिरांदानी यां बिल्डरांनी बिल्डींग चे निर्माण केले. या वसाहत मध्ये मुंबई शहराचा विकास होत होता. त्या विकासात रेल्वे, परिवहन, फ्लाईओवर या सुविधांसाठी या प्रकल्पा मध्ये येणाऱ्या बऱ्याच वस्त्या तोडण्यात आल्या. झोपडपट्टी पुनर्वास योजना (एस आर एस) योजना अंतर्गत त्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या प्रभावित/पिडीत परिवारांना या लल्लुभाई कंपाऊंड येथे पुनर्वसन करण्यात आले. लल्लुभाई कंपाऊंड मध्ये ३० हजार पेक्षा जास्त लोक येथील ७० बिल्डींग मध्ये राहतात. हिंदू , मुस्लीम, बौद्ध, इत्यादी जाती धर्माची लोक तसेच साउथ इंडियन, मराठी, हिन्दी, तेलगु भाषा बोलणारी आणि मोठ्या प्रमाणात रोजंदारी वर काम करणारे ही सर्व सँडहर्स्ट रोड, परेल, सान्ताक्रुज, एलफिस्टन, सीएसएमटी-CSMT, भायखळा इत्यादी ठिकाणाहून आलेली आहेत.
लल्लुभाई कंपाऊंड कडे पहिल्यांदा पहिले तर असे वाटते कि वस्ती मध्ये राहणाऱ्या लोकांना कॉंक्रीट बिल्डींग मध्ये पुनर्वसन केले गेले आहे. हे एक सकारात्मक पाउलच्या रुपात सादर केले जाते.पण बारकाईने बघितले तर असे दिसून येते कि लोकं उपयुक्त घराकरिता आवश्यक सुविधा पासून वंचित आहेत.घराच्या बदल्यात घर तर मिळाले पण मुलभूत सुविधा मिळाल्या नाही. ह्या परिस्थितीत जेव्हा लोकांना इथे पुनर्वसन केले तेव्हा मुलभूत सुविधा सोबत त्यांचे रोजगार, आरोग्य ,शिक्षण, संरक्षण तसेच मुलांच्या सर्वांगिक विकासावर ह्याचा परिणाम होऊ लागला. पुनर्वसन केले तेव्हा मुलांसाठी काही खास शिक्षणाची व्यवस्था नव्हती. मुल मोठ्या प्रमाणात शाळा बाह्य झाली होती. बिल्डींग च्या खाली तसेच शाळेच्या वाटेवर नशा करणाऱ्या टोळीमुळे मुलांना असुरक्षित वातावरण वाटत होते.तसेच कंपाऊंड च्या बाहेर शाळेत जाणाऱ्या मुलांना रेल्वे पटरी क्रॉस करून जावं लागत होते. तेव्हा अनेक रेल्वे अपघात होत होते. त्यामुळे मुल आणि पालकात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.छेड-छाड,पेट्रोलिंग,नशा,मैदानाचा अभाव त्यामुळे मुलांच्या शाररीक विकासावर पण परिणाम होत होता.अशा वातावरणात मुलांचे आयुष्य अंधारात व असुरक्षित झाले होते.
युथ फॉर युनिटी अँड व्हॉलंटरी एक्शन (YUVA) ही एक नॉन प्रॉफिट संस्था आहे. वंचित दुर्लक्षित समुदायासोबत त्यांच्या मुलभूत अधिकार आणि सुविधांसाठी काम करत आहे. मुले हि एक समाजाचा महत्वपूर्ण भाग आहे .मुलांसाठी सुरक्षित, हिसामुक्त तसेच बाल प्रेमी वस्ती व शहर निर्माण करण्यासाठी मुलांना काय वाटते, मुल काय विचार करतात , मुलांची मत समजून घेण्यासाठी तसेच त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी मुलांचे गट बांधणी तसेच त्यांना व्यक्त होण्यासाठी एक मंच निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्यामुळे मुल आपले मत पालक, व्यवस्था मधील पोलीस ,शाळा ,लोकप्रतिनिधी यांच्यासमोर मांडतात.
युवाची एक रणनीती आहे “ज्यांचे प्रश्न त्यांचे नेतृत्व” या रणनीती नुसार युवाने २००१ रोजी जेव्हा मुंबईत मोड-तोड होत होती. मुलांचे शिक्षण आणि संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा मुलांचे एक अधिवेशन घेतले त्या अधिवेशनात मुल एकत्र आली आणि आपले प्रश्न सरकार पुढे मांडण्याकरिता एक संघटन तयार केले ज्याचे नाव ‘बाल अधिकार संघर्ष संघटन आहे’ आणि हे नाव मुलांनीच दिले. या संघटन च्या माध्यमातून मुलांनी लोकप्रतिनिधी आणि सरकार पुढे आपले मत मांडले ज्यात शाळा सुरु असताना मोड-तोड करू नये आणि आणि जेव्हा मोडतोड होते तेव्हा मुलांच्या संरक्षणाबाबत विचार व्हावा या भूमिकेमुळे सरकार ला विचार करावा लागला होता.
लल्लुभाई कंपाऊंड मध्ये मुलांची सुरक्षा आणि सहभागीता या विषयी युवाने जेव्हा काम सुरु केले तेव्हा मुलांना संयुक्त राष्ट्रच्या बाल हक्क संहितामध्ये नमूद बाल सह्भागीता या अधिकारानुसार संघटीत व एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा पालक मुलांना बिल्डींग च्या खाली आणि कोणत्या प्रक्रियेत अजिबात सहभागी होऊ देत नव्हते. पालकांसोबत एक मिटींग घेतली तेव्हा पालकांनी मुलांच्या सुरक्षा बाबत प्रश्न निर्माण केला. मुलांच्यासोबत चालणारी प्रक्रिया विषयी पालकांना सविस्तर माहिती दिली तसेच सतत पालकांशी चर्चा सत्र सुरु होते, त्यानंतर काही मुल गटात येऊ लागली आणि हळू-हळू बाल अधिकार संघर्ष संघटन मध्ये सहभागी होऊ लागली. संघटन मध्ये सहभागी मुलांना सोबत घेऊन,मुलांवर परिणाम करणारे मुद्दे आणि सुरक्षित व असुरक्षित जागा विषयी मैपिंग करण्यात आले.
मुलांनी केलेल्या मैपिंगनुसार शिवम शाळेत जाताना मुलींची होणारी छेड-छाड /लैंगिक शोषण /खेळाचे मैदान या ठिकाणी असुरक्षित वाटणे /रेल्वे पटरी क्रॉस करून शाळेत जाणे /बिल्डींग मध्ये अंधार असणे आणि लिफ्ट /नशा या सर्व समस्येवर मुलांच्या सह्भागीतेने मुलांकरिता सुरक्षित वातावरण बनविण्यासाठी नियोजन करण्यात आले.यात ही यंत्रनेची उदानसीनता आणि अभ्यास,शाळा,पालकांचा हवा तसा सपोर्ट नसताना हि अनेक अडचणींना तोंड देत मुलांनी संघटन मध्ये अनेक मुल जोडली आणि नियोजनानुसार वरील सर्व प्रश्नांना घेऊन स्कूल चलो अभियान, मुलांवर होणार्या सर्व प्रकारच्या शोषणापासून स्वतंत्र्य ,बुली नही बडी बनिये,बच्चो कि सुनो फिर उम्मेद्वार चुनो इत्यादी अभियान तसेच लल्लुभाई तुला माझ्यावर भरोसा नाही का हे नुक्कड नाटक सादर केले. या माध्यमातून लोकांना समस्यावर विचार करण्यास लावले.मुलीची छेड छाड होते ते थांबविण्यासाठी मुलींच्या गटाने चाय पर चर्चा या कार्यक्रमातून लिंग समानता या विषयी चाय च्या टपरी वर चर्चा सुरु केली. शाळेजवळ होणारी छेड छाड ला घेऊन संघटन च्या शिष्ट मंडळाने मंत्रालय गाठले. मुख्यमंत्री यांच्या PA नी मुलांनी मांडलेल्या मुद्याची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावर मानखुर्द पोलीसानी पेट्रोलिंग सुरु केली, आज त्या ठिकाणी बारकोड लावण्यात आले आहे. यामुळे छेडछाड चे प्रमाण कमी झाले.खेळाचे मैदान मध्ये मुल मुली एकत्र येऊन विविध स्पर्धा आणि खेळाचे आयोजन करण्यात आले त्यामुळे मुलांना त्रास देणारे घटक कमी झाले. शाळेत जाताना पटरी क्रॉस करून शाळेत जाताना बरीच अपघात होत आहेत या मुद्याला घेऊन मुलांनी संघटनेच्या माध्यमातून खासदारांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. त्यांनी मुलांच्या निवेदनानुसार ब्रिज बांधून दिला.या सर्व प्रक्रिया करत असताना पोलीस/स्थानिक लोक यानी मुलांना या सर्व गोष्टीच्या मागे लागू नका, तुम्ही मुल आहेत काही होणार नाही असा सल्ला ही दिला तरी मुलांनी न थांबता आपले कार्य सुरूच ठेवले. दरम्यान च्या काळात त्यांना जेव्हा कळाले कि मुलांसाठी महाराष्ट्र सरकार च्या २०१४ च्या शासन निर्णय नुसार नगरसेवक स्तरावर बाल संरक्षण समिती गठीत होने अपेक्षित होते.पण शासन निर्णय येऊन 5 वर्ष ओलांडली तरी मुंबईत कुठेच समिती गठीत झाली नाही हे जेव्हा बाल अधिकार संघर्ष संघटन च्या बाल साथीनं कळल्यावर त्यांनी शासन निर्णय स्वतः समजून घेतला आणि CPC क्या है? हे नाटक तयार केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी सादर केले. याच नाटकाला बघून प्रभाग क्रमांक १३५ च्या नगरसेविका प्रभावित झाल्या आणि त्यांनी त्यांच्या वार्डमध्ये बाल संरक्षण समिती गठीत केली. त्यांनी नुसती समिती गठीत नाही केली तर समितीच्या माध्यमातून अनेक सक्रीय कार्यक्रम घेतले आणि मुंबईतील एक आदर्श समिती म्हणून हि नावलौकिक केले. बाल अधिकार संघर्ष संघटन च्या माध्यामतून असे अनेक परिवर्तन मुलांनी संघर्ष करून घडून आणले. या बदलाव च्या प्रक्रियेत सहभागी मुल आज त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात संविधानिक मूल्यांना घेऊन पुढे वाटचाल करत आहेत आणि उच्च शिक्षण घेत आहेत आणि हो हिंसामुक्त आणि सुरक्षित समाजासाठी आज ही मुलांचा प्रयत्नशील संघर्ष सुरुच आहे.
बाल अधिकार संघर्ष संघटन मध्ये मुले जेव्हा सहभागी होतात तेव्हा सर्व प्रथम त्यांचे अधिकार आणि जबाबदारी ची जाणीव होते.त्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होतो तसेच संविधानिक मुल्य रुजले जातात. मुलांमध्ये सर्वागीण विकास व नेतृत्व गुण विकसित होऊन ते आत्मविश्वासाने आपली मते बिनधास्तपणे व्यवस्था तसेच मोठ्या लोकांसमोर मांडतात. खऱ्या अर्थाने पाहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थे मध्ये मुलांचा सहभाग हा एक सक्रीय आणि जबाबदार नागरिक च्या दिशेने होणारी वाटचाल दिसून येते.