धार्मिक दंगली, अतिवृष्टी / महापूर भूकंप दुष्काळ महामारी व कोणतेही नैसर्गिक आपत्ती असो याचा फटका फक्त सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनाच बसतो
महामारी, धार्मिक दंगली, दुष्काळ यापैकी जगात काहीही झालं तरी गरीबाचीच होरपळ होते. इतर घटकांना किमान प्रिव्हिलेज असल्याने त्यांना निदान 2 वेळचं जेवण तरी मिळतं. हे आज पुन्हा एकदा जवळून अनुभवलं.
सध्या सर्वाना कोरोना च्या काळात असंघटित कामगारांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे अचानक चालू झालेली महामारीने असंघटित कामगारांना उद्ध्वस्त करून टाकले आहे अगोदर हाताला काम नव्हते नुकतेच कामाचा प्रभाव वाढत होता तेवढ्यात अचानक झालेला कडकडीत बंद” घरातून बाहेर पडणे मुश्कील झालेच सोबतच कल्पना होती की दोन-चार दिवस हा बंद राहिल पण तसे झाले नाही तो बंद वाढत गेला जस जसा बंद वाढत गेला तस तसे घरातील जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा वाढत पुढे गेल्यानंतर उपासमारीची वेळ जवळ आली आणि घरातील सगळे होते नव्हते ते संपल्याळे पुढे शहरात अडकून पडावे की पायी-पायी घरचा रस्ता धरावा असा प्रश्न सर्वांच्या मनामधे सतावत होता. अजूनही या परिस्थितीचा सामना करत आहेतच अडकून पडलेल्या कोपरखैराने नाक्यावरील प्रदीप नावाच्या कामगाराशी झालेला संवाद.
“हलो. प्रदीप कशे आहात काय चाललय’’
“दादा, खूप वाईट वेळ आली आमच्यावर, घरात काहीच खायला उरलेलं नाही आता. रोज कोपरखैराने येथे खिचडी वाटणाऱ्याची गाडी येते. आम्हाला चमचाभर खिचडी देतात आणि मोठमोठ्या कॅमेरामधून आमचे फोटो काढतात. गाडी आली की आमची पोरं भुकेच्या पायी ताटल्या घेऊन त्या गाडीच्या मागे पाळतात ना तेव्हा आमचा गहिरा जीव तुटतो दादा, काय करता अशी वेळ आली.काही दिवसांपासून पोरांना थोडं फार खाऊ घालतोय आणि आम्ही उरलं तर खातो नाहीतर पाणी पिऊन झोपून राहतो.कंबर बसल्यासारखे होतय दादा, आतापर्यंत काम करून खाल्लं. कधीच कोणापुढे हात नाही पसरवला पण या बिमारीने आम्हाला ते पण करायला भाग पाडलं. कष्ट करणारे हात आता दोन पुढे सर्कवावे लागत आहेत मूल घरात भाकर’आहे का असं विचारतात तेव्हा असं वाटतं की आत्महत्या करून घ्यावी.” आज मुलांची परिस्थिती ऐकून त्यांच्या काळजीने रडायला येते.
खरंतर वस्तीत आलेल्या अन्नाच्या गाडीमागे धावावं लागणं हे वस्तीतल्या लोकांना जड जातंय सोबतच अनेकांचं म्हणणं आहे की आज आमच्यावर अशी वेळ आली तर लोकं घासभर अन्न देऊन त्याचे ढीगभर फोटो काढताय. तर जिथे कुठे हे वाटप सुरु असेल तिथे ते सन्मानपूर्वक होतंय का हाही महत्वाचा विषय आहे.
पण दादा यात गोर गरीबांची का्य चुकी काही वेळेला बोले जातेकी झोपडी वाले रोगराई पसरवतात पण हा रोग तर विमानाने आपल्या झोपडीतअनुन सोडला आहे ना..आता काय होणार शेवटी गावचा रस्ता धरावाच लागणार…
आधार मिळाला असता दोन सरकारी योजनेचा…
मोठी आशा होती पण तसे नाही घडले.
एक:- राशन-पाण्याची सोय झाली असती राज्य सरकारने ३ महीने मोफत रेशनिग देण्याची घोषणा केलि आहे रेशन कार्ड वर मोफत रेशनिग द्याचा निर्णय घेतला पण ज्याचे रेशन कार्ड जवळ असेल त्यालाच रेशनिग मिळाले बाकी लोकाना मिळाले नाही. त्यात पोटाचे खळगी भरण्यासाठी शहरात आलेले कामगार कुठे रेशन कार्ड वरचा पत्ता बदलत बसणार शहरात मला काम मिळेल की नाही याची शाश्वती नसलेले कामगार कुठे तुरंत रेशन कार्ड बदलून घेणार.या तांत्रिक अडचनिमुळे तो ही योजनेचा लाभ त्यांच्या वाटयाला आला नाही.
दोन: कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने स्थापित केलेला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मडळ. या मंडळा मधे काही महत्वाच्या योजना आहेत.या योजने अंतर्गत कामगारांना विविध स्वरुपाची मदत मिळून देता अली असती पण काही नियम अटी शर्ती व सरकारच्या नकरात्मक दृष्टिकोनामुळे तेही शक्य झाले नाही पण आता या पुढे ते शक्य होऊ शकते फक्त सरकारची इच्याशक्ती आणि कामगाराना मदत करण्याची भूमिका असली पाहिजे तर हे शक्य आहे.
शेवटी काय तर COVID19 महामारीतून संवेदनशील आणि सर्व संस्था कार्यकर्ते संघटना ह्या मदत करणाऱ्यांच्या आधाराने हेही दिवस निघून जातील पण या दरम्यान आलेली लाचारी आणि त्यातून त्यांचा चुरडला गेलेला आत्मसन्मान मात्र ते कदाचित आयुष्यभर नाही विसरू शकणार
नवी मुबई काही वार्ड आधिकारी कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्यास तयार आहेत पण मनामधे शंका बाळगुणच एगदा पेपर त्यांच्या कार्यालयात जमा केले की पुन्हा परत केव्हा मीळतिल याची शाश्वती नाही फक्त आम्ही करत आहोत आणि थोडा वेळ लागेल अश्या प्रकारची उत्त्तरे मीळत आहेत. पण काही अधिकारी देतही आहेत थोडा संघर्ष करावा लागत आहे. कायदे आहेत व्यवस्था आहे निर्णय का घेतले नाही?
कामगार आयुक्त यांनी तुरंत धडक मोहोम घेऊन लोकांची नोदणी करणे गरजेचे होते.शिवाय ज्या लोकांची नोदणी झालेली आहे त्यांना तुरंत योजनेचा लाभ देणे गरजेचे होते तसेच पुनर्र नोदणी न करता सुद्धा मागील नोदणीवर लाभ देणे सुद्धा शक्य झाले असते पण तेही नाहीच झाले….
सरकार ने सध्या तुरंत धडक मोहिम कामगारांची नोदणी करणे गरजेचे आहे खासकरून वेगवेगळ्या टिकाणी बांधकाम कामगारांचे नाके शोधून त्या ठिकाणी कॅम्प लावणे गरजेचे आहे गरज भासल्यास स्थानिक संस्था संघटनाची मदत घेण्यात यावी तसेच बांधकाम कामगार नोदणी करण्यासाठी ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची अट आहे आणि कामगारांना ते मिळवणे मुश्कील होत आहे तरी हे प्रमाणपत्र देण्यासठी स्थानिक संस्था संघटनांना अधिकार देण्यात येतील का यावर विचार करावा.
या काळात युवा सारख्या संस्थेने फार मोठी भूमिका घेतली अडचणीत सापडलेल्या व घरी दोन वेळेचे नीट जेवण मिळत नसलेल्या लोकांना संपर्कमध्ये घेऊन त्यांना महिनाभर पुरेल एवढा शिधा युवा च्या वतीने लोकांपर्यंत पोहचवला गेला त्यामध्ये फक्त आपण काम करणाऱ्या विभागातच नाही तर विरार पासून चर्चगेट विटी पासून ते कल्याण डोंबिवली बदलापूर कर्जत आणि मानखुर्द ते पनवेल या ठिकाणी सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार वर्गापर्यत शिधा पोचवला. काही ठिकाणी तयार जेवण हि पुरवले गेले. बऱ्याच लोकांनी त्यासाठी युवा चे स्वागत हि केले कोरोनाच्या काळात हि महत्वाची भूमिका हि निस्वार्थ पुणे पार पाढली.