मुले ही आपल्या समाजातील सर्वात वंचित व् दुर्लक्षित असा घटक आहे. ती कायम मोठयावर अवलंबून असतात.त्यामुळे मुलांचे शोषण होण्याचे प्रमाण आपल्याला समाजात मोठ्या प्रमाणे दिसून येते .मुलांच्या सुरक्षेच्या दुर्ष्टीने मुलांचा सहभाग हा मुलांच्या संबंधित सर्व प्रक्रिया मध्ये मोठ्या प्रमाणात वाढविणे आवश्यक आहे. मुलांच्या अर्थपूर्ण सहभागाच्या दृष्टीने व संवेदनशील रित्या मुलांचा सहभाग हा मुलांच्या सुरक्षेच्या संधर्भातील एक अतिशय महत्वाचे पाऊल आहे.
या दृष्टीकोनातून मुलांच्या सहभागाने मुलांच्या संरक्षणाचे प्रश्न समजून घेण्यासाठी बाल सभेचे आयोजन करणे गरजेचे आहे . बाल संरक्षण समिती म्हणून आपला प्रभाग मुलांच्या दृष्टीने किती सुरक्षित आहे, त्या प्रभागात कोणत्या सोय- सुविधा चा अभाव आहे ज्या मुळे मुलांवर परिणाम होतो तसेच आपल्या प्रभागात बालकामगार ,बाल लैंगिक शोषण ,मुलांवर होणाऱ्या हिंसा ,एकल पालक असणारी मुल ,नशा करणारी मुल,तसेच शाळेतील गळती चे प्रमाण या सर्व मुद्यांवर मुलांची मत काय आहेत हे व अशा सर्व प्रश्न समजून घेण्यासाठी बाल सभेचे आयोजन केले पाहिजे. बाल सभेच्या नियोजना पासून तर आयोजना पर्यंत मुलांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. बाल सभा ही मुलांशी मुलांच्या समस्या समजून घेण्यासाठी खूप एक प्रभावी संवादाची प्रक्रिया आहे .
बाल सभेचे आयोजन मुलांशी चर्चा करून बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष व सुपरवायझर यांनी प्रभागातील मोक्याची जागा किंवा कम्युनिटी सभागृह किंवा शाळेत आयोजन केले पाहिजे .तसेच सभेचे सूत्र संचालन व प्रमुख पाहुणे म्हणून बालसभेमध्ये बाल साथीच्या सहभागातून , बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून नगरसेवक ,आंगणवाडी सुपरवायझर,पोलीस स्टेशन मधून बाल संरक्षण अधिकारी आणि इतर समितीचे सदस्य या सभेमध्ये उपस्थित राहून मुलांच्या संरक्षणाचे प्रश्न समजून घेऊन त्यावर संबंधीत विभागाच्या समितीच्या जबाबदार सदस्यांनी आरोग्य –शिक्षण — सुरक्षा — सोय सुविधा या विषयी बाल साथींना आश्वासित करणे आणि बाल सभेला संबोधित करताना समितीच्या अध्यक्ष म्हणून नगरसेवकांनी उपस्थित मुलांच्या प्रश्नावर कृती कार्यक्रम या बाल सभेतून जाहीर करता येऊ शकतो. हिंसामुक्त , सुरक्षित आणि बाल प्रेमी प्रभाग निर्माण करण्यासाठी बाल सभा ही महत्त्वपूर्ण माध्यम असू शकते.
प्रकाश भवरे, युवा