Skip to main content
Child Rights

बाल मित्र  – एक संकल्पना  

By July 22, 2025No Comments

मुलांच्या सुरक्षिततेसाठी सजग /जागृत समाजाची जबाबदारी

दर दिवशी आपण वर्तमानपत्र ,टीव्हीवर, मुलांवर घरी, शाळा, आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या अत्याचार ,हिंसेच्या घटना बघतो, वाचतो, ऐकतो, प्रत्यक्षात पाहतो, आणि तेवढ्या पुरता आपण शिट् ,खुप वाईट झाले असे म्हणतो.  कधी कधी तर निषेध मोर्चा आणि रेलीत देखील सहभागी होतोआणि स्वताची समजुत करुन घेतो आपण खुप मोठी जबाबदारी पार पाडली. पण खरंच आपण आपली जबाबदारी पार पाडत आहोत का? 

 मुलं आपल्या देशाचे भविष्य आहेत. त्यांचे योग्य संगोपन, संरक्षण आणि विकास ही पालक, समाज आणि राष्ट्राची एकत्रित जबाबदारी आहे. मात्र अनेक वेळा आपल्याला समाजात मुलांवरील अत्याचार, दुर्लक्ष, शोषण, बाल मजुरी, आणि हिंसा  दिसूनही आपण दुर्लक्ष करतो. कधी कधी तर आपण आपल्या समोर मुलांवर अत्याचार होत असताना हि व्यवस्थेची जबाबदारी आहे. असे बोलून पळ काढतो.

मुलांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होऊ नये म्हणून आपल्याला मुलांचे बाल मित्र व्हावे लागेल. मुलांचे प्रश्न,समस्या,त्यांचे अधिकार आणि कायदे तसेच त्यांच्या भावना, विचार समजून घेणे गरजेचे आहे.

Bal Mitra Ek Sankalpana - YUVA India
  • बालमित्र म्हणजे कोण?

बाल मित्र म्हणजे असा व्यक्ती जो आपल्या परिसरातील, वस्तीतील मुलांच्या  सुरक्षिततेसाठी सजग असतो. मुलांच्या सुरक्षा आणि विकासाच्या दृष्टीने मुलांच्या संरक्षणासाठी मुलांच्या समस्या समजुन घेणारा, मुलांवर अशा घटना होऊ नये म्हणून शासन, संस्था यांच्या मदतीने. मुलांकरिता सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणारा, आणि जर मुलांवर  अत्याचार होत असेल किंवा मुलांच्या अधिकाराचे हनन झाल्यास  त्यांच्यासाठी आवाज उठवणारा आणि योग्य वेळी मुलांना सपोर्ट,आधार देऊन  मुलांच्या संरक्षणासाठी पोलिस, चाईल्ड हेल्पलाईन यांच्या मदतीने मुलांना सुरक्षित करणारा कोणी हि बाल मित्र  होऊ शकतो.

कोणताही सामान्य युवक, महिला, शिक्षक, पोलिस, वकील, कामगार,अंगणवाडी सेविका, किंवा समाजातील जबाबदार नागरिक बालमित्र असू शकतो. यासाठी कुठल्याही पदवीची किंवा शिक्षणाची गरज नाही,  गरज आहे ती फक्त मुलांप्रती संवेदनशीलतेची आणि सजगतेची.

  •  बालमित्रांची भूमिका 

१.आपल्या वस्तीतील मुलांच्या समस्या समजून घेणं.

२. मारहाण, बालविवाह, शाळा सोडणे, अत्याचार यासारख्या घटनेत बालकांना मदतीचा हात देणं तसेच त्यांच्या सुरक्षेच्या बाजूने भूमिका घेणे.

३. मुल जर संकटात आढळून आली तर child helpline १०९८ वर त्या विषयी माहिती देणे.

४.मुलांविषयी असणारे कायदे आणि यंत्रणा यांच्या विषयी स्वतः जागृत होणे आणि  लोकांमध्ये जनजागृती करणे.

५.  बाल संरक्षण समिती, सखी सावित्री समिती चे स्थापना करण्या करिता पुढाकार घेणे तसेच पोलिस ,CWC यांच्याशी गरज असल्यास संपर्क साधणे.

६. आपल्या परिसरातील मुलांच्या सुरक्षेबाबत सतत जागरूक असणं

७ .मुलांच्या संरक्षणाप्रती विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे 

८.यंत्रणा आणि मुलांचा संवाद घडवुन आणण्यासाठी सार्वजनिक मंडळ, बचत गट किंवा स्थानिक संस्थेच्या मदतीने बाल सभा, राउंड टेबल चे आयोजन करणे.

बाल मित्र का गरजेचे आहेत –मुलांवर होणारे शोषण, दुर्लक्ष, बालविवाह, लैंगिक, बालमजुरी अत्याचार अनेकवेळा समोर येत नाहीत. कारण समाजात मुलांप्रती असलेली असंवेदनशीलता आणि उदासीनता यामुळे डोळ्यादेखत अनेक घटना घडतात पण काहीच करता येत नाही.बाल मित्र म्हणून मुलांसाठी हिंसा मुक्त,सुरक्षित, बाल प्रेमी वातावरण आणि मुलांच्या प्रती संवेदनशील समाज निर्माण व्हावा आणि बाल मित्र या भूमिकेतून मुलं आणि सामाज व यंत्रणा यांच्यातला दुवा बनुन एक मुलां करिता सपोर्ट सिस्टम तयार होऊ शकते.

 बाल मित्र संकल्पनेचे फायदे –  मुलांसाठी एक सपोर्ट सिस्टीम तयार होऊ शकते, आणि समाजात सुरक्षा आणि संवादाचं वातावरण तयार होऊ शकते तसेच बाल संरक्षणाच्या यंत्रणांना सहयोग मिळुन. बालहक्कांची जाणीव आणि जागृता वाढल्याने प्रतिबंध करण्याची प्रक्रिया बळकट होऊ शकते.

🔹 बाल मित्र घडवण्यासाठी काय करावं?

बाल मित्र म्हणून स्वता पुढाकार घ्यावा लागेल. मुलांच्या संरक्षण, कायदे आणि बाल अधिकाराची जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यशाळा, शिबिरे आयोजित करावीत.प्रत्येक बस्ती, शाळा, वस्तीसमुहात बाल मित्र तयार करावेत.

“बाल मित्र” ही संकल्पना म्हणजे फक्त सामाजिक जबाबदारी नव्हे, तर एक मानवी मूल्य प्रणाली आहे.आपण ज्या समाजात राहतो, तिथल्या प्रत्येक मुलाचं हसणं, शिकणं, आणि सुरक्षित असणं ही आपलीही जबाबदारी आहे.आपण सगळेच “बाल मित्र” होऊ शकतो तर चला मुलांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याकरिता आज त्यांना सुरक्षित करण्याची जबाबदारी पार पाडुया.

प्रकाश युवराज भवरे 

बाल अधिकार कार्यकर्ता 

युवा