

कॉम्प्लेक्ससिटी म्हणजे काय? ही संकल्पना ज्यावेळी माझ्यासमोर आली त्यावेळी मला असंख्य प्रश्न निर्माण झाले? पण शांततेने मी स्वतः यावर विचार करायला सुरुवात केली त्यावेळी समजल कॉम्प्लेक्ससिटी म्हणजे जटिल, गुंतागुंतीच एक शहर. शहर गुंतागुंतीच आहे या मताशी मी सहमत आहे कारण या शहरात विविध धर्माचे, जातीचे, भाषेचे, संस्कृतीचे, प्रादेशिक विभागाचे लोक राहतात. धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून सर्व प्रकारच्या लोकांना या शहरात राहण्याचा, जगण्याचा, समान न्याय मिळण्याचा हक्क प्राप्त होतो. विशिष्ट वर्गाला उत्तम विचारसरणी देण्यापेक्षा सर्वांना समानतेची एक विचारसरणी कशी देता येईल यातूनच युवाने संकल्पना मांडली ज्ञानाच्या लोकशाहीकरणाची. आधुनिकीकरणाच्या युगात किंवा आधुनिकीकरणाच्या नावाखाली पारंपरिक असणारी आमची संस्कृती कोणीही हिसकावून घेवू नये उलट तिचे जतन केले जावे म्हणून आम्ही संकल्पना मांडली दडलेल्या, लपलेल्या, हरविलेल्या शहरातील सांस्कृतिक उपक्रमाची. हजारो युवक बेरोजगारीमुळे व्याकुळलेले आहेत, योग्य मार्गदर्शन मिळत नाही, मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, काय करावं कळत नाही असा प्रश्न युवकांसमोर आहे? यातूनच आम्ही संकल्पना मांडली मेकिंग मुंबईची. शहर कोणा एकाच नसून ते सर्वांचं आहे आणि सर्वांना शहराबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. तो अधिकार जपण्यासाठी युवकांना पथनाट्य, वादविवाद, छायाचित्र या स्पर्धांच्या माध्यमातून संधी मिळावी त्यांनी त्यांची समुदायाविषयी, राज्याविषयी, देशाविषयी मते मांडावीत म्हणून आम्ही संकल्पना मांडली बोलती मुंबईची. शहराचा इतिहास समजून घ्यावा, शहराची सुरुवात समजून घ्यावी, वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देता यावी म्हणून आम्ही संकल्पना मांडली चालत्या — बोलत्या मुंबईची.
या सर्व संकल्पनांना घेऊन आम्ही ६ दिवसात १५०० लोकांपर्यंत पोहचलो. हा एक केवळ ६ दिवसांचा उपक्रम नव्हता तर मला वाटत हा एक वस्तुस्थिती जाणण्याचा परिपाठ, स्वतःच आयुष्य हरविलेल्या लोकांना स्वतःचा शोध घेण्याचा मार्ग होता. तब्बल दोन महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी आम्ही सर्व युवा साथी करत होतो. एवढा सुंदर कार्यक्रम सर्वांनी घेतलेल्या जबाबदारीने पार पडला. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे अनमोल असे योगदान आहे. एवढी सगळी जबाबदारी असताना साथी उत्तम मिळाल्याने हसत खेळत आनंदात सहभाग दर्शविता आला. या उपक्रमातून बऱ्याचशा आपल्या कमी दिसून आल्या. बऱ्याच ठिकाणी आपण खूप वेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीने पुढे जातोय याचा आनंद झाला.
उपक्रमाच्या माध्यमातून कृती नियोजन आपल्याला काय करता येईल याचा विचार एप्रिल मध्ये करता येईल का? याबद्दल आपली मते मांडण्याचा प्रयत्न करुया. इतरांसाठी आपण स्वतः अशा कार्यक्रमात हरवून जातो हेच या कॉम्प्लेक्ससिटी चे रहस्य आहे असे मला वाटते. या कॉम्प्लेक्ससिटीच्या माध्यमातून मी स्वतःला एकच अहवान करेल….
मी न फक्त बोलतं व्हावं…
मी व्हावं लीहतं…
मी व्हावं वाचत…
मी व्हावं विचारतं…
मी व्हावं नेटकं…
मी व्हावं लोकापयुक्त…
जिंदाबाद…
नामदेव गुलदगड — युवा साथी